5 जूनला के पूर्व आणि के पश्चिम विभागातील 'या' परिसरात पाणीपुरवठा बंद

जलवाहिनी जोडण्याच्या कामामुळे पाणीपुरवठा खंडित होणार आहे.

5 जूनला के पूर्व आणि के पश्चिम विभागातील 'या' परिसरात पाणीपुरवठा बंद
SHARES

के पूर्व आणि के पश्चिम विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा १६ तास बंद राहणार आहे. तर काही परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

के/पूर्व विभाग येथील महाकाली गुंफ़ा मार्गावरील ‘रम्य जीवन सोसायटी’ जवळ तसेच कार्डिनल ग्रेसीयस मार्ग व बी. डी. सावंत मार्ग चौक, अंधेरी (पूर्व)’  येथे नवीन १५०० मिली मीटर व्यासाची जलवाहिनी  आणि १२०० मिली मीटर व्यासाची जलवाहिनी (पार्ले आऊटलेट) जोडण्याचे काम सोमवार दिनांक ५ जून २०२३ रोजी सकाळी ८ वाजेपासून ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे.

सदर कालावधीत सोमवार दिनांक ५ जून २०२३ रोजी सकाळी ८ वाजेपासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत (१६ तास) खालील विभागात नमूद केल्याप्रमाणे पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

के / पूर्व आणि के / पश्चिम विभागातील पाणीपुरवठा खंडित होणाऱया परिसरांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे आहे

१) त्रिपाठी नगर, मुन्शी कॉलनी, बस्तीवाला कंपाऊंड, कलेक्टर कॉलनी, दुर्गा नगर, मातोश्री क्लब, जोगेश्वरी (पूर्व) - पाणीपुरवठा पूर्णपणे बंद.

२) सारीपुत नगर, दुर्गा नगर, जोगेश्वरी (पूर्व) - पाणीपुरवठा पूर्णपणे बंद.

३) विशाल हॉल, वर्मा नगर, कामगार कल्याण, मांजरेकर वाडी, बिमा नगर, गुंदवली गावठाण पंथकी बाग, तेली गल्ली, कोलडोंगरी, जीवा महाले रोड, साईवाडी, जीवन विकास केंद्र मार्ग, अंधेरी (पूर्व) शिवाजी नगर, संभाजी नगर, हनुमान रोड, श्रद्धानंद रोड, नेहरू रोड, तेजपाल रोड, शास्त्री नगर, राजेंद्र प्रसाद नगर, आंबेडकर नगर, काजुवाडी, विले-पार्ले पूर्व तसेच विले-पार्ले पूर्व डोमेस्टिक एयरपोर्ट, अमृतनगर, रामबाग, चकाला गावठाण, चकाला वजन काटा, अंधेरी पूर्व पाणीपुरवठा पूर्णपणे बंद.

४) मोगरपाडा, नवीन नागरदास रोड, जुना नागरदास रोड, अंधेरी (पूर्व) - पाणीपुरवठा कमी दाबाने होईल.


 के / पश्चिम* –

१) मोरागाव, जुहू गावठाण, सांताक्रूझ (पूर्व) - पाणीपुरवठा पूर्णपणे बंद.

संबंधित परिसरातील नागरिकांनी उपरोक्त नमूद कालावधीत पाणी कपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.



हेही वाचा

वांद्रे, सांताक्रूझसह 'या' भागातील पाणीपुरवठा ४ जूनपासून प्रभावित

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा