भारत बंद : जबरदस्ती दुकानं बंद करणाऱ्यांना पोलिसांचा इशारा

मुंबईत लावण्यात आलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने पोलिस अधिकारी मुख्य नियंत्रण कक्षातून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून राहणार आहे.

भारत बंद : जबरदस्ती दुकानं बंद करणाऱ्यांना पोलिसांचा इशारा
SHARES

देशात शेतकाऱ्यांनी दिल्लीत पुकारलेल्या  भारत बंदला आता महाराष्ट्रातूनही प्रमुख राजकिय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. या बंदचे पडसाद मुंबईतही उमटण्याची चिन्हे आहेत. मात्र या बंदमध्ये टॅक्सी, रिक्षा आणि बस हे बंदमध्ये सहभागी होणार नाहीत. तरी या आंदोलनात जर कुणी जबरदस्ती दुकानं बंद करण्याचा प्रयत्न केल्यास अशांवर मुंबई पोलिसांनी कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

मुंबईत बंदच्या पार्श्वभूमिवर अतिरिक्त फौजफाटा मुंबईच्या महत्वाच्या स्थानकांवर तैनात असणार आहे. त्याच बरोबर राखीव पोलिस आणि रॅपीड फोर्सही पोलिसांच्या मदतीला राहणार आहे. मुंबईत लावण्यात आलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने पोलिस अधिकारी मुख्य नियंत्रण कक्षातून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून राहणार आहे. तर गरज पडल्यास ड्रोनची देखील मदत घेतली जाणार आहे.  सोमवारी मध्यरात्रीपासूनच पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. जर कुणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यास त्याच्यावर संबधित कलमांर्गत कारवाई करण्यता आली. असे असतानाच या पूर्वीच पोलिसांनी कोविडच्या पार्श्वभूमीवर कलम १४४ हे लागू ठेवलेले आहे. त्यामुळे नागरिकांनी कायदा हातात न घेता. शहरातील कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यामध्ये पोलिसांनी मदत करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचाः- भारत बंद! मुंबईत बेस्ट, टॅक्सी सुरू राहणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा