पत्नीनंच पतीला सुपारी देऊन संपवलं, ११ वर्षानंतर लागला छडा

दारूड्या पत्नीच्या जाचाला कंटाळून पत्नीनं अापल्या पतीचाच काटा काढवण्याचं ठरवलं. अापल्या पतीला संपवण्याची सुपारी तिने दोघांना दिली. तब्बल ११ वर्षांनंतर या प्रकरणाचा छडा लावण्यात मुंबई पोलिसांना यश अालं अाहे.

पत्नीनंच पतीला सुपारी देऊन संपवलं, ११ वर्षानंतर लागला छडा
SHARES

व्यसनाधीन पतीच्या जाचाला, मारहाणीला कंटाळून एका ६० वर्षांच्या महिलेनं अापले दागिने गहाण ठेवले अाणि अापल्या पत्नीला संपवण्याची सुपारी दिली. तब्बल ११ वर्षांनंतर या प्रकरणाचा उलगडा झाल्याने मुंबईत खळबळ उडाली अाहे. याप्रकरणी पोलिसांनी पत्नीसह दोघांना अटक केल्याचे पोलीस उपायुक्त मनोजकुमार शर्मा यांनी सांगितले.



असा झाला हत्येचा उलगडा

नागपाडा परिसरात राहणाऱ्या किसन उमरचंद कारवा यांची ११ वर्षांपूर्वी हत्या झाली होती. या हत्येचे धागेदोरे मिळत नसल्यामुळे तपासाची फाईल एका पोलीस अधिकाऱ्याकडून दुसऱ्याच्या हातात जात होती. तरीही अारोपीला पकडण्यात पोलिसांना अपयश येत होते. याचदरम्यान नागपाडा परिसरात राहणाऱ्या फिरासत अली शहा अाणि इरशाद अली शहा या दोघांचा या हत्या प्रकरणात हात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यो दोघांनी चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. इतकंच नव्हे तर खरा खूनी कोण, याचा खुलासा केल्यानंतर पोलीसही अचंबित झालं. किसन यांचा खुनी दुसरा-तिसरा कुणी नसून त्यांची अर्धांगिनी बन्सीबेन कारवा हिच असल्याचे त्यांनी सांगितले.


मृतदेहाचे केले तुकडे

दारूच्या व्यसनामुळे पतीकडून बन्सीबेन खारवा यांचा मानसिक व शारिरीक त्रास होत होता. या रोजच्या त्रासाला कंटाळूनच तिने किसन खारवा यांच्या हत्येची सुपारी फिरासत अाणि इरशाद यांना दिली. त्यानुसार या दोघांनी किसनची हत्या करून त्याचे तुकडे केले होते. किसनच्या मृतदेहाचे अर्धे धड परिसरात सापडले. मात्र उर्वरीत भाग न सापडल्यामुळे मृत व्यक्तीची ओळख पटली नव्हती. ११ वर्षानंतर या हत्येचा उलगडा लावण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुखलाल वर्पे यांच्या पथकाला यश आल्याचे पोलिस उपायुक्त मनोजकुमार शर्मा यांनी सांगितले. दोनही आरोपींना अधिक तपासासाठी जे.जे. मार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा