मोकाट कुत्र्याला सांभाळणं महिलेच्या बेतलं जीवावर; महिलांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू

मोकाट कुत्र्याला (dog) सांभाळल्यामुळे डोंबिवलीतील (dombivali) एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे.

मोकाट कुत्र्याला सांभाळणं महिलेच्या बेतलं जीवावर; महिलांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू
SHARES

मोकाट कुत्र्याला (dog) सांभाळल्यामुळे डोंबिवलीतील (dombivali) एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. कुत्र्याला आसरा दिल्याने चाळीतील काही महिलांनी या महिलेला जबर मारहाण (Beating) केली. मारहाणीनंतर काही तासातच हृदयविकाराच्या झटक्याने त्या महिलेचा मृत्यू (death) झाला. नागम्मा शेट्टी असं या मृत महिलेचं नाव आहे,

पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. नागम्मांच्या पतीचं निधन झालं असून त्या आपल्या मुलीसोबत डोंबिवलीत  (dombivali) मानपाडामध्ये एका चाळीत राहतात. मंगळवारी त्यांनी एका मोकाट कुत्र्याला घराजवळ बांधलं. या कुत्र्याच्या भुंकण्याच्या त्रासामुळे चाळीतील चार महिलांचं नागम्मासोबत जोरदार भांडण झालं. हे भांडण विकोपाला जाऊन त्या महिलांनी नागम्माला बेदम मारहाण केली. 

त्यानंतर हे प्रकरण पोलिसांत गेलं. पोलिसांनी नागम्मा यांना रुग्णालयात जाऊन उपचार करून घेण्यास सांगितलं. मात्र, रुग्णालयात जाण्याऐवजी त्या घरी परतल्या. त्यानंतर रात्री उशिरा त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. चारही महिलांनी नागम्मा यांच्या छातीवर बेदम मारहाण केल्याचा आरोप नागम्माची मुलगी सुनिता यांनी केला आहे. त्यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. मात्र पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.



हेही वाचा -

अंधेरीतील कंपनीत भीषण आग

कोरोनापासून वाचवा! मुंबईतल्या तरूणीचं भारत सरकारला आवाहन




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा