वाकोल्यात टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू


वाकोल्यात टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू
SHARES

रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना शहरातील मार्गांवर नागरिकांच्या सुरक्षेबाबत आजही ठोस पावले उचलली जात नाही. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा समोर आला आहे. वाकोला परिसरात एका महिलेचा रस्ता ओलांडताना मृत्यू झाला आहे.


टेम्पोच्या धडकेत चांदनीचा मृत्यू

महालक्ष्मी परिसरात राहणाऱ्या चांदनी विश्वकर्मा (३२) या काही कामानिमत्त गुरूवारी दुपारी ३ वाजता वाकोला येथे त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आल्या होत्या. नातेवाईकांना भेटून त्या घरी परतत असताना रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी भरधाव वेगात असलेल्या टेम्पोने चांदणी यांना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, चांदणी या जागेवरच बेशुद्ध पडल्या. 


टेम्पो चालकाला अटक

स्थानिकांनी त्यांना जवळील शासकिय रुग्णालयात नेत वाकोला पोलिसांना पाचरण केले. पण रुग्णालयात उपचारादरम्यान चांदणी यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी टेम्पो चालकावर गुन्हा नोंदवत त्याला अटक केली. या दुर्घटनेत चांदणी यांचा मृत्यू झाल्याने विश्वकर्मा कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळा आहे. 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा