15 व्या मजल्यावरून शेजारणीनेच चिमुरडीला फेकले

 Byculla
15 व्या मजल्यावरून शेजारणीनेच चिमुरडीला फेकले

भायखळा - घोडपदेव येथील 15 व्या मजल्यावरून चिमुरडीला फेकल्याप्रकरणी पोलिसांनी रेखा विश्वनाथ सुतार (38) नावाच्या महिलेला अटक केलीय. मानवी इंगळे या पाच वर्षीय मुलीला रेखानेच नैराश्येतून 15 व्या मजल्यावरून खाली फेकले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

19 डिसेबरला मानवी इंगळे (5) नावाच्या चिमुरडीचा 15 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. मानवी इंगळे ही वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याची मुलगी असून त्यांच्या शेजारच्या महिलेनेच मानवीला फेकल्याचा आरोप त्यांनी केला होता. याप्रकरणी पोलिसांनी याआधीच खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. सांगितले जातंय की तपासादरम्यान पोलिसांना मानवीच्या शरीरावर रेखा सुतारचा डीएनए आढळला. त्या आधारावर तिला अटक केल्याची माहिती भायखळा पोलिसांनी दिली.

सहा महिन्यांपूर्वी रेखाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे ती नैराश्यात होती. त्यात ज्या दिवशी मानवीचा खून झाला त्या दुपारी रेखा सुतारच्या घरी नवऱ्याने पाठवलेली घटस्फोटाची नोटीस घेऊन कोर्टाचा बेलीफ आला होता. ही नोटीस बघून रेखा गांगरली तिने नोटीस घेण्यास नकार दिला. म्हणून बेलीफ शेजारीच असलेल्या मानवी इंगळेच्या घरी गेला आणि मानवीच्या वडिलांना रेखाला समजवण्यास सांगितले. मानवीचे वडील अशोक इंगळे यांनी देखील रेखाला समजावले. पण ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिने बेलीफला परत पाठवून दिले. या सर्व प्रकरणाचा रेखाला भयंकर राग आला होता. त्याच रागातून तिने मानवीला खाली फेकून दिले. या प्रकरणी शुक्रवारी रेखाला अटक करण्यात आली.


 

Loading Comments