लज्जास्पद ! तरुणीकडे पाहून अश्लील चाळे, विकृताला अटक

मुलीने तो करत, असलेल्या अश्लील चाळे मोबाइलमध्ये चित्रीकरण करून घेतले. त्यानंतर पीडित मुलीने आपल्या मित्राला मदतीसाठी बोलावले.

लज्जास्पद ! तरुणीकडे पाहून अश्लील चाळे, विकृताला अटक
SHARES

मुंबईच्या कांदिवली परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे बस स्टॉप वरती उभ्या असलेल्या तरुणीकडेबघून अश्लील हावभाव करणाऱ्या एका तरुणाला कांदिवली पोलिसांनी अटक केलेली आहे. आरोपी तरुण तरुणीकडे पाहून अश्लील हावभाव करत होता आणि या सगळ्या प्रकाराच चित्रीकरण तरुणीने स्वतःच्या मोबाईलवर केलं आणि मदतीसाठी मित्राला फोन केला. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

हेही वाचाः- अखेर उर्मिला मातोंडकर यांच्या हाती शिवबंधन, केला शिवसेनेत अधिकृत प्रवेश

भाईंदर मध्ये राणारा आरोपी विजय फतलानी हा सेल्समन आहे. पीडित मुलगी कांदिवली परिसरातील बेस्ट बस स्टाँपवर बोरिवलीला जाणाऱ्या बेस्ट बसची वाट बघत उभी होती. त्यावेळी आरोपीने तिच्याकडे पाहून अश्लील चाळे करण्यास सुरूवात केली . सुरवातीला तरुणीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र आरोपी जाणून बुजून त्रास देण्याच्या उद्देशाने हे करत असल्याचे लक्षात आल्यानंतर मुलीने तो करत, असलेल्या अश्लील चाळे मोबाइलमध्ये चित्रीकरण करून घेतले. त्यानंतर पीडित मुलीने आपल्या मित्राला मदतीसाठी बोलावले. मुलीचा मित्र घटनास्थळी पोहचल्यानंतर आरोपीने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न देखील केला. त्यावेळी मुलीने आणि तिच्या मित्राने रिक्षाने पाठलागकरून त्याला पकडले. आरोपी विरोधात कांदिवली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असल्याचे पोलिस निरीक्षक रवी अडाणे यांनी सांगितले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय