महिलेचा मंत्रालयासमोर अात्महत्येचा प्रयत्न; शेजारील इसम देत होता त्रास

अन्सारीच्या त्रासात सुटण्यासाठी अखेरचा पर्याय म्हणून दिपाली मंत्रालयात गृह विभागात न्याय मागण्यासाठी अाल्या होत्या. मात्र, सुरक्षा रक्षकांनी त्यांना अात जाऊ दिलं नाही. त्यामुळे संतापलेल्या दिपाली यांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोरच स्वतःला पेटवून घेऊन अात्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

महिलेचा मंत्रालयासमोर अात्महत्येचा प्रयत्न; शेजारील इसम देत होता त्रास
SHARES

शेजारील इसम रोज देत असलेल्या त्रासाला कंटाळलेल्या एका महिलेने गुरूवारी मंत्रालयासमोर अात्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही महिला स्वतःला पेटवून घेत असताना पोलिसांनी तिला पकडले अाणि ताब्यात घेतले.


पोलिसांकडून दखल नाही

चेंबूरच्या अारसीएफ परिसरात दिपाली भोसले (२७) ही महिला राहते. तिच्या शेजारी राहणारा सय्यद मोहम्मद अन्सारी तिला रोज त्रास देत होता. रोजच्या त्रासाला दिपाली कंटाळल्या होत्या. त्यांनी अन्सारीविरोधात अारसीएफ पोलिस ठाण्यात तक्रारही केली. मात्र, पोलिसांनी या तक्रारीची दखलही घेतली नाही. वारंवार तक्रार करूनही पोलिस कारवाई करण्यास टाळाटाळ करत होते.

गृह विभागाकडं न्यायासाठी

अन्सारीच्या त्रासात सुटण्यासाठी अखेरचा पर्याय म्हणून दिपाली मंत्रालयात गृह विभागात न्याय मागण्यासाठी अाल्या होत्या. मात्र, सुरक्षा रक्षकांनी त्यांना अात जाऊ दिलं नाही. त्यामुळे संतापलेल्या दिपाली यांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोरच स्वतःला पेटवून घेऊन अात्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दिपाली यांनी अापल्या अंगावर राॅकेल ओतण्यास सुरूवात करताच तेथे तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना पकडलं. वेळीच पोलिसांनी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी नंतर दिपाली यांना कुलाबा पोलिसांकडं सोपवलं. 



हेही वाचा -

स्वस्तात सोने देण्याच्या अामिषाने २४ लाख लांबवले; ५ जणांना अटक

नक्षलवादी कनेक्शन प्रकरण: ५ विचारवंतांना १२ सप्टेंबरपर्यंत नजरकैद




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा