सासरच्या जाचाला कंटाऴून महिलेची आत्महत्या

 Mumbai
सासरच्या जाचाला कंटाऴून महिलेची आत्महत्या

कांदिवली - सासरच्यांकडून वारंवार होणाऱ्या छळाला कंटाऴून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना अंधेरी (प.) मध्ये घडली. तर तिच्या सासरच्यांनीच विष देऊन तिची हत्या केल्याचे मृत महिलेच्या माहेरच्यांनी म्हटलंय.

मृत महिलेचं नाव कुलसुम खान (27) असं असून ती कांदिवली (प.) इथल्या फैजाने रसूल वेल्फेअर सोसायटीतील रहिवासी होती. उत्तर प्रदेशच्या रायबरेलीमध्ये राहणाऱ्या नईम खानसोबत तिचं दोन वर्षापूर्वी लग्न झालं होतं. मात्र लग्नानंतर नईम आपल्या कुटुंबियांसह मुंबईत राहण्यासाठी आला.

कुलसुमच्या लग्नात तिच्या सासरच्यांनी हुंडा म्हणून गाडी आणि पैशांची मागणी केल्याची तक्रार कुलसुमचे वडील लियाकत हुसैन यांनी पोलिसांकडे केली. इतकेच नाही तर तिचे सासरचे कुलसुमला कधी माहेरी देखील पाठवत नव्हते असा आरोप तिच्या वडिलांनी केलाय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासरच्या जाचाला कंटाळून महिलेने 25 मार्चला आत्महत्या केली. त्यानंतर तिच्या पतीने उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल केलं. मात्र 30 मार्चला तिची प्रकृती खालावल्याने तिला कोकिलाबेन रुग्णालयात हलवण्यात आलं. पण 31 मार्चला पहाटे 4.30 वाजता तिचा मृत्यू झाला.

आई-वडिलांनी नोंदवलेल्या तक्रारीनंतर मृत महिलेचा पती नईम खानसह त्याचे वडील आणि आई यांच्यासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असल्याचे कांदिवलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद पवार यांनी सांगितलं.

Loading Comments