डंपर चालकाने महिलेला चिरडले

 Kaju Pada
डंपर चालकाने महिलेला चिरडले
डंपर चालकाने महिलेला चिरडले
डंपर चालकाने महिलेला चिरडले
See all
Kaju Pada, Mumbai  -  

गोरेगावरून अंधेरीच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपर आणि अॅक्टीव्हामध्ये शुक्रवारी भीषण अपघात झाला. या अपघातात माया पुराणिक(55)ही महिला जागीच ठार झाली. हा अपघात काजूपाडा जंक्शन, न्यू लिंक रोड येथील टेक वेबसेंटर जवळ दुपारी 3 च्या सुमारास झाला. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी डंपर चालकास अटक केली आहे.

मेट्रोच्या कामामुळे आणि त्यातच अरूंद रस्त्यामुळे येथे वारंवार येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रासाचा सामना सहन करावा लागत आहे. याआधीही गेल्यावर्षी एका वृद्ध महिलेला आपला असाच जीव गमवावा लागला होता. त्यामुळे प्रशासन याची दखल कधी घेणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Loading Comments