कल्याणमध्ये महिला डॉक्टरची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

घरगुती वादातून महिला डॉक्टर प्राजक्ता यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसंच, या प्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास करत आहेत.

SHARE

कल्याणमध्ये एका महिला डॉक्टरने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्राजक्ता प्रणव कुलकर्णी असं या महिलेचं नाव आहे. घरगुती वादातून महिला डॉक्टर प्राजक्ता यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसंच, या प्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास करत आहेत.

मंगळवारी सकाळच्या सुमारास प्राजक्ता यांनी इमारतीच्या आठव्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्या केली. कल्याणच्या खडकपाडा परिसरातील महावीर हाईट्स या इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर प्राजक्ता आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होत्या. प्राजक्ताचे पती प्रणव कुलकर्णी देखील डॉरक्टरच आहेत.

दरम्यान, प्राजक्ता यांनी इमारतीवरून उडी मारल्यानंतर तातडीनं कुटुंबीयांनी आणि शेजाऱ्यांनी प्राजक्ताला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. परंतु, रुग्णालयात दाखल करण्याअगोदरच प्राजक्ता यांचा मृत्यू झाला होता.हेही वाचा-

ठाण्यातील महिलेचा न्यूझीलंडमध्ये संशयास्पद मृत्यू

चाइल्ड पाॅर्नोग्राफी बघाल, तरी ५ वर्षे तुरूंगात जाल!संबंधित विषय
ताज्या बातम्या