तलावात बुडून मजुराचा मृत्यू


तलावात बुडून मजुराचा मृत्यू
SHARES

गोरेगावच्या फिल्मसिटीजवळील तलावात बुडून सोमवारी एका 26 वर्षीय मजुराचा मृत्यू झाला. हा मजूर फिल्मसिटीतील एलाइड युनियनमध्ये काम करत होता.

यासंदर्भात आरे पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणाले की, फिल्मसिटी परिसरातील तलावात 5 मित्र फिरण्यासाठी गेले होते. त्यापैकी दोघाजणांनी तलावात उतरून पोहण्याचा प्रयत्न केला. मात्र रहिश नाशीर खान (26) या तरूणाला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. त्याच्या इतर मित्रांनी त्याला पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात ते अयशस्वी ठरल्याने रहिशचा बुडून मृत्यू झाला.

तर, फिल्मसिटीचे सुरक्षा रक्षक सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, रहिश हा मजूर एलाइड मजूर संघटनेत काम करत होता. त्याच्यासोबत चार जण फिल्मसिटीत आले होते. त्यापैकी तीन जणांकडे पास किंवा फिल्मसिटीतील कुठलेही कार्ड नव्हते. रहिशला पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

पोलिसांनी या प्रकरणाची अपघाती मृत्यू अशी नोंद करत रहिशचा मृतदेह सिद्धार्थ रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा