मुलुंड कोर्टाबाहेर प्रेमी युगुलाची विष पिऊन आत्महत्या

मुलुंड दंडाधिकारी न्यायालयाबाहेर एका प्रेमीयुगुलाने गाडीत विष पिवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या दोन्ही मृतांची ओळख पटली असून मुलुंड पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत.

मुलुंड कोर्टाबाहेर प्रेमी युगुलाची विष पिऊन आत्महत्या
SHARES

कुटुंबीयांनी प्रेमविवाहला नकार दिल्याने मुलुंड दंडाधिकारी न्यायालयाबाहेर एका प्रेमीयुगुलाने गाडीत विष पिवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या दोन्ही मृतांची ओळख पटली असून मुलुंड पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत.


अपमृत्यूची नोंद

या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पोलिसांनी अग्रवाल रुग्णालयात पाठवले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती झोन ७ चे पोलिस उपायुक्त अखिलेश सिंग यांनी दिली.


विरोधाचं कारण काय?

मुलुंड परिसरात राहणारी २३ वर्षीय तरुणी हिंदू असून मुलगा हा मुस्लिम धर्मीय आहे. त्यामुळे दोघांच्या ही घरातून त्यांच्या प्रेमसंबधांना विरोध होता. यावरूनच मुलीचं मंगळवारी रात्री तिच्या कुटुंबीयांसोबत जोरदार भांडण झालं होतं. याच भांडणातून दोघांनीही भेटून हे टोकाचं पाऊल उचलल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.


रात्री केली आत्महत्या

मंगळवारी रात्री १२ ते ४ च्या दरम्यान या दोघांनी मुलुंड न्यायालयाबाहेरील पार्किंगमध्ये कार उभी करून विष पिऊन आत्महत्या केली. रात्री उशिरा या दोघांच्या आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी अग्रवाल रुग्णालयात पाठवले. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.हेही वाचा-

साजिद खाननंही केलं आयपीएलमध्ये बेटिंग

बिटकाॅईन घोटाळ्याप्रकरणी राज कुंद्राला समन्सRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
POLL

मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्सला हरवून सलग तिसरा विजय नोंदवणार का? काय वाटते? प्रतिक्रिया नोंदवा.
Submitting, please wait ...
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा