Amitabh Bachchan's Jalsa bungalow ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याबाहेर रक्तपात

या हल्यात अकिलच्या पोटावर, छातीवर आणि उजव्या हाताच्या दंडावर हल्ला केल्याने तो त्यात जखमी झाला असून त्याच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Amitabh Bachchan's Jalsa bungalow ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याबाहेर रक्तपात
SHARES

अमिताभ बच्चन यांचा चाहता वर्ग फक्त देशभरातच नाही तर जगभरात आहे. त्यांची एक अदाकारी पाहण्यासाठी आजही त्यांच्या बंगल्याबाहेर त्याचे चाहते गर्दी करत असतात. असाच एक चाहता अमिताभ यांच्याभेटीसाठी त्यांच्या ‘जलसा’ या बंगल्याबाहेर मागीत ५ दिवसांपासून झोपत होता. मात्र गुरूवारी या चाहत्यावर तीन मद्यपींनी जिवघेणा हल्ला केला. या हल्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कुपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी जुहू पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा नोंदवला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- Keep an identity card in your pocket घराबाहेर पडताना खिशात ओळखपत्र ठेवा, अन्यथा पोलिस कारवाईला सामोरे जा

या प्रकरणातील तक्रारदार अकील रफिक अहमद (३५) हा मूळचा उत्तरप्रदेशच्या बरेलीतील ताईपुरी पोलिस चौकी परिसरात राहणारा आहे. तो प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चनचा मोठ फॅन असून ३० जून रोजी घरातल्यांना न सांगताच तो मुंबईला आला होता. त्या दिवसांपासून तो दररोज अमिताभ यांच्या बंगल्याबाहेर झोपत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. दरम्यान ४ जुलैच्या मध्यरात्री अकील हा अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याच्या समोरील भारती आरोग्य निधी हाँस्पिटलच्या फुटपाथवर झोपला होता. त्यावेळी त्या ठिकाणी राजेंद्र , विकास, रमेश हे तीन आरोपी त्या ठिकाणी आले. अकीलला एकटे पाहून त्यांनी त्याला जबरदस्ती दारू पिण्यासाठी चल असा आग्रह केला. याला अकिल याने विरोध केल्याने अकिल आणि तीन आरोपींमध्ये शाब्दीक वाद झाला. त्यावरून तीनही आरोपींनी अकीलवर चाकूने हल्ला केला. या हल्यात अकिलच्या पोटावर,  छातीवर आणि उजव्या हाताच्या दंडावर हल्ला केल्याने तो त्यात जखमी झाला असून त्याच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अंधेरी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अंधेरी पोलिसांना या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेत हा गुन्हा पुढील तपासासाठी त्यांनी जुहू पोलिसांकडे वर्ग केला आहे.

हेही वाचाः- Transfers of IPS and SPS officers canceled सरकारचा प्रशासकिय गोंधळ सुरूच, IPS  आणि SPS अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश मागे

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अकिल देत असलेल्या माहितीत अनेक विसंगती आढळून येत आहे. कधी अकिल हल्ला झालेले ठिकाण हे अंधेरी पूर्व असे सांगत आहे. बहुदा घरातल्यांना न कळवता अकिल मुंबईला पहिल्यांदाच आला आहे. कधी अमिताभ बच्चन यांचा फॅन आहे असे सांगतो. तर कधी अन्य कुठल्या अभिनेत्याचा त्यामुळे तपासाला योग्य दिशा मिळत नाही आहे. घटनास्थळाचे सीसीटिव्ही ही तपासण्यात आले आहेत. मात्र अकिलवर ज्या ठिकाणी हल्ला झाला तो परिसरात सीसीटिव्हीमध्ये दिसत नाही आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती जुहू पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा