मँगो गोळीनंतर आता तरुणाई नव्या व्यसनांच्या आहारी

तंबाखूमिर्शित पावडर आणि नशायुक्त मँगो पावडर तर काही ठिकाणी गांजा व प्रतिबंधित असलेला गुटखा सर्रास मोठय़ा प्रमाणात विकली जातात

मँगो गोळीनंतर आता तरुणाई नव्या व्यसनांच्या आहारी
SHARES

विविध प्रकारची घातक व्यसने सहजरीत्या पानटपर्‍यांवर मिळत असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह तरुण मंडळी अशा व्यसनांच्या आहारी जाऊ लागली आहे. नवनवीन व कमी दराची व्यसने सहज उपलब्ध होत आहे. मँगो गोळीनंतर आता पानटपर्‍यांवर विशेष प्रकारची कागदी पट्टी मिळत असून तिचा उपयोग अंमली पदार्थाचे सेवन करण्यासाठी केली जात आहे. नुकतेच अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांवर कारवाईची संख्या वाढली असली, तरी त्यावर नियंत्रण ठेवण्यात आपयश येत असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत म्हटले होते. 

हेही वाचाः- ​आयुक्तांनी केली कुख्यात गुंड एजाज लकडावालाची कसून चौकशी​​​

अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर मुंबई पोलिसांकडून वेळोवेळी प्रतिबंधक उपाय योजना करून ही शहरात छुप्यापद्धतीने अंमली पदार्थांची तस्करी सुरूच आहे. मुंबईच्या अंमली पदार्थ विभागाची आकडेवारी पाहिली असता. मागील दोन वर्षात कारवाईची संख्या दुप्पटीने वाढलेली आहे. मात्र तरी ही लहान-लहान दुकानांमधून विविध सुगंधी तंबाखूमिर्शित पावडर आणि नशायुक्त मँगो पावडर तर काही ठिकाणी गांजा व प्रतिबंधित असलेला गुटखा सर्रास मोठय़ा प्रमाणात विकला जात असल्याचे पाहावयास मिळत होते. या व्यसनी जिनसा विकत घेणार्‍या ग्राहकांमध्ये तरुणांचा मोठय़ा प्रमाणात समावेश आहे.

हेही वाचाः- ​Exclusive सराईत गुन्हेगारांना 'एमपीडीएचा' धाक - पोलिस आयुक्तांचे आदेश​​​

असे असले तरी आता बाजारात नव्या पद्धतीची स्वस्त व्यसन करणारी सामग्री मिळत असल्याने तरुण याकडे वळताना दिसत आहेत. एका कागदी पट्टीमध्ये विविध अंमली पदार्थ टाकून ते ओढण्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय या पट्टीला गुंडाळून त्यामध्ये निर्माण झालेल्या पोकळीत गांजा किंवा तंबाखू टाकून ती सिगारेटसदृश बनवून ओढली जात असल्याचे विविध ठिकाणी दिसत आहे. या नवीन प्रकाराबरोबरीने चॉकलेटच्या गोळीसारखी दिसणारी आणि खिशाला परवडणारी अशी नशाकारक भांगेची मँगोगोळी घेण्याचे प्रमाणही वाढले असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचाः-  मध्य रेल्वेचे सीएसएमटी पहिलं 'इट राइट स्टेशन'

तरुण मंडळी या विविध व्यसनाच्या आहारी जाऊन पूर्णपणे व्यसनी बनले असून यामधील मुंबईत असलेल्या काही महाविद्यालयातील तरुण व्यसनमुक्त पुनर्वसन केंद्रात उपचार घेत असल्याचे समजते. अलीकडेच मुंबईशहरातील अशाच एका व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणाला पुनर्वसन केंद्रात व्यसनमुक्तीसाठी दाखल केले होते. मात्र या तरुणाचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या पार्श्‍वभूमीवर स्थानिक पोलिसांनी अशा चुकीची व्यसने विकणार्‍यांवर कठोर कारवाईची मागणी समोर येत आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा