व्हाॅट्सअॅपवर 'सुसाईड नोट' पाठवून तरूणाची आत्महत्या


व्हाॅट्सअॅपवर 'सुसाईड नोट' पाठवून तरूणाची आत्महत्या
SHARES

व्हाॅट्सअॅपवर 'सुसाईड नोट' पाठवून एका २४ वर्षीय तरूणानं आत्महत्या केल्याचा दुर्दैवी प्रकार गोरेगाव पूर्वेला घडला आहे. शमूवेल घोरपडे (२४) असं या तरूणाचं नाव असून त्यानं उंदीर मारण्याचं औषध घेऊन आत्महत्या केली. प्रेमभंग झाल्यानं त्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे.


मेसेज पाहताच घरच्यांची धावपळ

"मी जीव देतोय याला कुणीही जबाबदार नाही" असा मेसेज शमूवेलने आपल्या आईला व्हाॅट्सअॅपवर लिहून पाठवला. हा मेसेज त्यानं आपल्या मित्रांनाही पाठवला. मेसेज वाचून त्याच्या आईला जबरदस्त धक्का बसला. रविवारी पहाटे ५ वाजता मेसेज येताच अशोक नगरमध्ये राहणाऱ्या त्याच्या कुटुंबीयांनी धावपळ सुरु केली. त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण संध्याकाळपर्यंत शमूवेलचा थांगपत्ता लागला नाही.


शरीरात विष सापडलंच नाही?

अखेर संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास त्यांच्याच परिसरातील एका आॅटो रिक्षात शमूवेल सापडला. त्याला वनराई पोलीस ठाण्यात नेण्यात आलं, तिथून त्याला तपासणीसाठी ट्रॉमा केअरला नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली, त्याचं रक्त तपासलं आणि अहवाल साधारण आल्याने त्याला घरी नेण्यात आलं.

शमूवेलने मात्र आपण विष घेतल्याचं कुणालाच संगितलं नाही. रविवारी रात्री शमूवेलला त्रास सुरु झाल्याने सगळ्यांनाच संशय आला, त्याला तात्काळ डॉक्टरांकडं नेण्यात आलं. जिथे शमूवेलने उंदिर मारण्याचे विष प्यायल्याचं समजताच डॉक्टरांनी त्याला सिद्धार्थ रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.


प्रेमभंगातून टोकाचं पाऊल

शमूवेलला सिद्धार्थ रुग्णालयात नेऊन त्याच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले. मात्र ताेपर्यंत शरीरात विष पसरल्याने मंगळवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. शमूवेलचे एका मुलीवर प्रेम होते. त्याला तिच्याशी लग्न करायचं होत. पण ते शक्य न झाल्याने शमूवेलने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती वनराई पोलिसांनी दिली आहे.



हेही वाचा -

ट्रॅफिक हवालदार लाच घेताना कॅमेऱ्यात कैद

चक्क मुंबई पोलीसच मद्यधुंदावस्थेत



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा