ट्रॅफिक हवालदार लाच घेताना कॅमेऱ्यात कैद


ट्रॅफिक हवालदार लाच घेताना कॅमेऱ्यात कैद
SHARES

मुंबई पोलिसांवर लाच घेतल्याचे आरोप होत असले, तरी पोलीस नेहमीच बचावात्मक भूमिकेत जातात. मार्च २०१७ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यासदंर्भात मुंबई उच्च न्यायालयात अहवालही सादर केला होता. ज्यात वाहतूक पोलिसांवर लाचखोरी संदर्भात एकही खटला दाखल नसल्याचा दावा करण्यात आला. पण पुन्हा एकदा पोलिसांवरील विश्वास उडेल, असाच प्रकार समोर आला आहे.


ट्रॅफिक हवालदाराने रिक्षाचालकाकडे मागितली लाच

शुक्रवारी २९ सप्टेंबरला सकाळी १० वाजेच्या सुमारास एक रिक्षाचालक जुहूच्या दिशेने सिग्नल तोडून पुढे जात होता. हे तिथे तैनात ट्रॅफिक हवालदाराने बघितले. पण या रिक्षा चालकावर कारवाई करण्याचे सोडून ट्रॅफिक हवालदाराने रिक्षा चालकाकडे लाच मागितली. हो नाही करता करता शेवटी रिक्षाचालकाने या वाहतूक पोलिसाला ५० रुपयांची नोट दिली. हा प्रकार घडत असताना जवळच उपस्थित असलेल्या 'मुंबई लाइव्ह'च्या प्रतिनिधींनी तो आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला.



रिक्षाचालकाने यासंदर्भात सांगितले की, 'जेव्हा मी सिग्नल ओलांडला, नेमका त्याच वेळेच लाल दिवा लागला. वाहतूक पोलिसाने मला पकडून माझ्याकडे २०० रुपये मागितले. पण आपली कोणतीच चूक नसल्याचे सांगितल्यानंतर त्याने माझ्याकडून ५० रुपये घेतले आणि मला सोडून दिले.


हेही वाचा - 

चक्क मुंबई पोलीसच मद्यधुंदावस्थेत

हायटेक ट्रॅफिक पोलीस



डाऊनलोड करा Mumbai live APP  आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा