हायटेक ट्रॅफिक पोलीस

  मुंबई  -  

  मुंबई - ट्रॅफिक पोलीस आता अदयावत झाले असून सीसीटीव्ही चलान नंतर अत्याधुनिक टोईंग गाड्या त्यांच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. एकूण ८० टोईंग गाड्या ट्रॅफिक पोलिसांच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत.

  आता तुमची गाडी जर ट्रॅफिक पोलिसांनी उचलली असेल तर टेंशन घेण्याचे कारण नाही. कारण आता तुमची गाडी कुठे नेली आहे? हे तुम्हाला एका फोनवर तसेच ऑनलाईन कळू शकेल. गाडी उचलताना टोचन करणारे अतिशय वाईट पद्धतीने गाडी हाताळतात. कित्येकदा त्यात गाडीचं नुकसान देखील होते. मात्र आता बाईक टोईंग करण्यासाठीही हायड्रॉलिक क्रेनचा वापर होणार आहे.

  या अद्यावत टोईंग गाड्या छोट्या रस्त्यावरही काम करण्यास सक्षम आहेत. या टोईंग वाहनांमध्ये कॅमेरा बसवण्यात आला असून गाडी उचलता क्षणी त्याची नोंद ही सर्वरमध्ये होणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.