छत्रपतींची तुलना योगी आदित्यनाथांशी करणे तरुणाला पडले महाग

 Pant Nagar
छत्रपतींची तुलना योगी आदित्यनाथांशी करणे तरुणाला पडले महाग
Pant Nagar, Mumbai  -  

मुंबई - उत्तर प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणे घाटकोपरमधील तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. छत्रपतींचा फोटो एडिट करून त्याला योगी आदित्यनाथ यांचा चेहरा लावून हा फोटो फेसबुकवर अपलोड केल्याप्रकरणी रिंकू गुप्ता नावाच्या तरुणाला पंतनगर पोलिसांनी अटक केली आहे.

रविवारी शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर योगी आदिनाथ यांचा चेहरा असलेला फोटो फेसबुकवर अपलोड केला असल्याचं संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना समजलं. त्यांनी याची शहानिशा केली असता कामराजनगरमध्ये रहाणाऱ्या रिंकू गुप्ता नावाच्या तरुणाने हा फोटो अपलोड केल्याचं समजलं. रिंकूला या सगळ्याचा जाब विचारला असता त्याने माफी मागितली. पण तेवढ्याने संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचं समाधान झालं नाही. ते त्याला घेऊन पोलीस ठाण्यात आले आणि त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. धार्मिक भावना दुखावण्याचा गुन्हा रिंकू गुप्ताविरुद्ध दाखल केला असून त्याला अटक केल्याची माहिती पंतनगर पोलिसांनी दिली.

Loading Comments