हिंदुस्तानी भाऊचं इन्स्टाग्राम अकाऊंट निलंबित

अनेक युजर्सनी त्याचे अकाउंट द्वेषयुक्त भाषण आणि हिंसाचारास प्रसिद्धी देणारं असल्याची तक्रार केली होती.

हिंदुस्तानी भाऊचं इन्स्टाग्राम अकाऊंट निलंबित
SHARES

कुठल्या ना कुठल्या वादात अडकणारा युट्यूबर आणि बिग बॉस 13 चा स्पर्धक हिंदूस्तानी भाऊला (Hindustani Bhau) इन्स्टाग्रामनं मोठा झटका दिला आहे. इन्स्टाग्रामनं (Instagram) त्याचे अकाउंट निलंबित केलं आहे. अनेक युजर्सनी त्याचे अकाउंट द्वेषयुक्त भाषण आणि हिंसाचारास प्रसिद्धी देणारं असल्याची तक्रार केली होती. अखेर इन्स्टाग्रामनं त्यांच्या गाइडलाइन विरोधात हिंदूस्तानी भाऊच्या पोस्ट असल्यानं त्याचं अकाउंट निलंबित केलं आहे.

नुकतेच पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये त्यानं हिंदू देवतांचा अपमान करणाऱ्यांवर अर्वाच्य शब्दात टीका केली होती. देवाचा अपमान करणाऱ्यांविरोधात कायदा हातात घेण्याची आणि कुणालाही न सोडण्याची भाषा त्यानं या व्हिडीओमध्ये केली होती.

१८ ऑगस्ट रोजी कॉमेडियन कुणाल काम्रा (Kunal Kamra) यानं हिंदूस्तानी भाऊचा एक व्हिडीओ शेअर केला होता. गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलिसांकडे द्वेष पसरवत असल्याची तक्रार केली होती. भाऊ द्वेष पसवरत असल्याचा आणि जमावाला उत्तेजन देत असल्याचा आरोप त्यानं यात केला होता.

हिंदूस्तानी भाऊ त्याच्या अर्वाच्य आणि शिवीगाळ करणाऱ्या भाषेसाठी प्रसिद्ध आहे. त्याचे मुळ नाव विकास फाटक आहे. तो सलमान खानच्या बिग बॉस १३ मध्ये वाइल्ड कार्ड एंट्री घेतली होती. तेव्हा त्याला विशेष प्रसिद्धी मिळाली होती. काही दिवसांपूर्वी भारतीय सैन्याचा अपमान केल्याचा आरोप करत त्यानं एकता कपूर हिच्या विरोधात देखील तक्रार दाखल केली होती.हेही वाचा

सुशांत आत्महत्या प्रकरणात सीबीआयला ‘या’ अडचणी येऊ शकतात

सुशांत आत्महत्येचा तपास करण्यासाठी सीबीआयचे विशेष पथक तयार

Read this story in हिंदी
संबंधित विषय