मी भारतात परतण्यास तयार, पण एका अटीवर- झाकीर नाईक

न्यायालय जोपर्यंत मला दोषी ठरवत नाही, तोपर्यंत मला अटक होणार नसेल, तर मी भारतात परत यायला तयार आहे, अशी अट घालत वादग्रस्त इस्लामिक धर्मप्रचारक झाकीर नाईक याने भारतात परत येण्याची तयारी दाखवली आहे.

मी भारतात परतण्यास तयार, पण एका अटीवर- झाकीर नाईक
SHARES

न्यायालय जोपर्यंत मला दोषी ठरवत नाही, तोपर्यंत मला अटक होणार नसेल, तर मी भारतात परत यायला तयार आहे, अशी अट घालत वादग्रस्त इस्लामिक धर्मप्रचारक झाकीर नाईक याने भारतात परत येण्याची तयारी दाखवली आहे. सोबत अंमलबजावणी संचलनालयाने आरोपपत्रात लावलेले आरोपही त्याने फेटाळून लावले आहेत. 


न्यायव्यवस्थेवर विश्वास 

‘द’ विक या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत नाईक म्हणाला की, माझा भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. केंद्रात भाजपाचं सरकार येण्याआधी आपण सरकारविरोधात बोलू शकत होतो. तेव्हा न्याय मिळण्याची शक्यताही ८० टक्क्यांपर्यंत होती. परंतु सद्यस्थितीत न्याय मिळण्याची शक्यता १० ते २० टक्केच उरली आहे. 

दहशतवादाच्या आरोपांचा सामना करणाऱ्या ९० टक्क्यांहून अधिक जणांची निर्दोष मुक्तता १० ते १५ वर्षांनंतर झाली आहे. मी भारतात परतल्यास मला किमान १० वर्षे तरी तुरूंगात टाकतील. त्यामुळे आश्वासन मिळणार नसेल, तर ही चूक मी करणार नाही. 


 आरोपी चुकीचे

सोबतच ‘ईडी’ने लावलेले आरोप राजकीय हेतून प्रेरित असल्याचं सांगत आपले उत्पन्नाचे अनेक स्त्रोत असून आपण नियमीत कर भरत असल्याचा दावाही नाईकने केला.

१ जुलै २०१६ रोजी ढाक्यात एका कॅफेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर झाकीर नाईकचं नाव समोर आले होते. या हल्ल्यात २० जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.

 


हेही वाचा-

झाकीर नाईकच्या खात्यात ४९ कोटी, ईडीचा न्यायालयात दावा

झाकीर नाईक विरोधात 'ईडी'कडून दोषारोपपत्र दाखल



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा