SHARE

आझाद मैदान - पुरोगामी शाहिरांचा वारसा चालवणाऱ्या कलाकरांची निर्दोष मुक्तता करा, या मागणीसाठी सोमवारी आझाद मैदानात उपोषण करण्यात आलं. लोकशाहीर सचिन माळी, सागर गोरखे, रमेश गायचोर हे 2011 पासून तुरुंगात आहेत. या सर्व लोकशाहिरांवरील खटले, गुन्हे मागे घेऊन त्यांची निर्दोष सुटका करावी अशी मागणी ब्लू टायगर संघटनेचे अध्यक्ष विलास रुपवते यांनी केली आहे. या कलाकारांना नक्षलवादी ठरवून त्यांच्यावर राजकीय सूडबुद्धीने प्रेरित होऊन खटले दाखल केल्याचा आरोप रुपवते यांनी केला. या वेळी शाहिरांच्या सुटकेसाठी ब्लू टायगरच्या शिष्टमंडळानं गृहमंत्री दीपक केसरकर यांना एक निवेदनही दिलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या