Advertisement

जाणून घ्या, भीमा-कोरेगावच्या शौर्याचा इतिहास


जाणून घ्या, भीमा-कोरेगावच्या शौर्याचा इतिहास
SHARES

भीमा-कोरेगाव येथे विजय स्तंभाला मानवंदना करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे लाखो अनुयायी १ जानेवारीला जमले होते. सकाळी आठ-नऊच्या सुमारास भीमा-कोरेगावनजीकच्या वढ बुद्रुक इथं दोन गटांमध्ये वादावादी झाली. त्यातून पुढे दगडफेक आणि मग जाळपोळीसारख्या घटना घडल्या.  भीमा-कोरेगाव,वढ बुद्रुक, शिक्रापूर,पेरणफाटा परिसरात तणाव निर्माण झाला.या जाळपोळीत एका तरूणाचा मृत्यू देखील झाला. या घटनेचे पडसाद मंगळवारपासून मुंबईतील विविध ठिकाणी उमटू लागले. पण नक्की या विजयस्तंभाचा इतिहास काय आहे? हे जाणून घेऊया


भीमा-कोरेगावजाणून घेऊया शौर्याचा इतिहास

पुण्याच्या कोरेगाव या गावात भीमा नदीच्या काठावर एक ऐतिहासिक लढाई झाली. या लढाई साधीसुधी नव्हती, कारण या लढाईने एक इतिहास रचला होता. १ जानेवारीला इ..१८१८ रोजी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनी आणि पेशव्यांच्या मराठा साम्राज्यात ही लढाई झाली. पेशव्यांच्या मराठा साम्राज्याच्या बाजूनं २८ हजार सैनिक होते. बापू गोखले आणि त्रिंबकजी डेंगळे यांनी गोळा केलेल्या सैन्यात २० हजार अरबी घोडेस्वार, गोसावी, मराठे मिळून २८ हजार सैनिकांचा फौजफाटा होता

तर, ब्रिटिशांकडे केवळ ८३४ सैनिक होते. या सैनिकांना साथ मिळाली ती बॉम्बे नेटिव लाइट इन्फेंट्री तुकडीच्या ५०० महार सैनिकांची. पूना ऑक्झिलरी हॉर्सेसचे ३०० घोडेस्वार आणि मद्रास आर्टिलरी या तोफखान्याचे २४ जण. या तुकडीत सामील होते. पेशव्यांच्या सैनिकांच्या तुलनेत ब्रिटिशांचं सैन्य अर्ध देखील नव्हतं. एकप्रकारे मनाने हरलेली लढाई ब्रिटिश लढत होते. पण पेशवाईच्या काळात होणाऱ्या अस्पृश्यतेला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मासाठी ब्रिटिशांच्या बाजूने पेशव्यांशी लढले आणि विजयी झाले. या युद्धात पराभूत झालेल्या मराठा साम्राज्याचा अस्त झाला.



महार सैनिकांच्या पराक्रमाची पराकाष्ठा

१६ व्या शतकात शिवाजी महाराजांनी इथल्या महारांमधील शौर्य आणि धाडस पाहून सैन्यामध्ये त्यांना महत्त्वाच्या स्थानावर रुजू केलं. शिवाजी महाराजांच्या सैन्यापासून खऱ्या अर्थानं महार सैनिकाला ओळख प्राप्त झाली.पण छत्रपती शिवाजी महाराजांनी महारांना दिलेला लढवय्या हा सन्मान पेशवाई काळात जाणीवपूर्वक संपवला जात होता. महार सैनिकांना  पेशव्यांच्या राज्यात कधीच योग्य वागणूक दिली जात नव्हती

पेशवाई काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत होतं. महार, मांग आणि इतर अस्पृश्यतांना अतिशय हिन वागणूक दिली जात होती. त्यालाच विरोध म्हणून ५०० महार सैनिक आत्मसन्मानासाठी ब्रिटिशांच्या बाजूनं पेशव्यांच्या विरोधात लढले. फक्त लढलेच नाही तर कमी सैन्यबळ असूनही धाडसाच्या जोरावर विजयी झाले. या युद्धात महार सैनिकांनी पेशव्यांना सळो की पळो करून सोडलं. या लढाईचं नेतृत्व करणारे बापू गोखलेंना यात वीरमरण आलं. त्यानंतर साडेतीन महिन्यांनंतर दुसरा बाजीराव इंग्रजांना शरण आला आणि मनाने हरलेली लढाई ब्रिटिश महार सैनिकांच्या शौर्यावर जिंकले.   


म्हणून ब्रिटिशांनी उभारला विजयस्तंभ

भीमा-कोरेगावच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी शूर महार सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी ७५ फूट उंच विजयस्तंभ उभारला. त्यावर २० शहीद आणि ३ जखमी महार सैनिकांची नावे कोरलेली आहेत. याशिवाय स्तभांवर One of the Triumphs of the British Army of the Earth’, असं लिहण्यात आलं आहे.



हेही वाचा-

भीमा कोरेगाव हिंसाचार: महाराष्ट्र बंदची हाक

मुंबईत शंभरहून अधिक आंदोलनकर्ते ताब्यात


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा