सरकारकडून पुस्तक विक्री


SHARE

दादर - बाबासाहेबांच्या ६० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर शिवाजीपार्क परिसरात सरकारच्यावतीने पुस्तकांची विक्री आणि प्रदर्शन लावण्यात आले होते. मात्र बाबासाहेबांच्या काही पुस्तकांचा यामध्ये समावेश असणे आवश्यक होते असे मत वाचकांनी यावेळी व्यक्त केले. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा या बाबासाहेबांच्या ब्रीद वाक्याला अनुसरून सरकारने पुस्तक वितरणाच्या माध्यमातून वाचकांना छान संग्रही राहतील असा खजिना उपलब्ध करून दिल्याची प्रतिक्रिया रुईया महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. प्रदीप वाघमारे यांनी दिलीय. तसेच हे प्रदर्शन किमान ४ दिवस ठेवावे जेणेकरून वाचकांना त्याचा लाभ घेता येवू शकतो अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या