सिंधी युवा संमेलनाचे आयोजन

 Chembur
सिंधी युवा संमेलनाचे आयोजन

चेंबूर - युवा पिढीला सिंधी समाजाची अधिक चांगली ओळख व्हावी आणि भविष्यात सिंधी समाज कसा अधिक पुढे जाईल याची जाणिव करुन देण्यासाठी शनिवारी चेंबूरमध्ये सिंधी युवा संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. मुंबई युवा विभागाचे सेक्रेटरी लक्ष्मण कन्नल यांनी या कार्यक्रमाचे आयोजन चेंबूरमधील स्वामी विवेकानंद महाविदयालयाच्या सभागृहात केले होते. यावेळी सिंधी समाजामधील अनेक मान्यवर तसेच मोठ्या प्रमाणात तरुण- तरुणींनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल देखील पाहायला मिळाली.

Loading Comments