छत्रपती शिवाजी टर्मिनस इमारतीचे होणार सुशोभिकरण

 Mumbai
छत्रपती शिवाजी टर्मिनस इमारतीचे होणार सुशोभिकरण

मुंबई - मुंबईतील ऐतिहासिक वास्तू असलेल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकावरील इमारतीचे सुशोभिकरण होणार आहे. मंगळवारी सुशोभिकरणाचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या वास्तू सुशोभिकरणाची पाहणी करण्यासाठी मध्य रेल्वेने इण्टेक या संस्थेसोबत करार केला आहे. या कंपनीने याआधी अनेक ऐतिहासिक वास्तूंची डागडुजी करून त्यांना गतवैभव प्राप्त करून दिले आहे.

या सुशोभिकरणासाठी मध्य रेल्वेला स्टेट बँक ऑफ इंडियाचे अर्थसहाय्य लाभणार आहे. कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्त्व निधीमधून हे काम होणार आहे. हा ठरावही मंगळवारी घेण्यात आलेल्या सभेत मंजूर  करण्यात आला. या कामाचा अहवाल येत्या काही महिन्यांमध्ये मध्य रेल्वेकडे सादर केला जाणार आहे. या बैठकीत स्टेट बँकेच्या संयुक्ता राजगुरू आणि इण्टेकच्या तस्नीम मेहता यादेखील उपस्थित होत्या.

Loading Comments