ढोल-ताशा पथकानं दिला जवानांना मदतीचा हात

गोरेगाव - देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांसाठी शिवगजर प्रतिष्ठान ढोल-ताशा पथकानं मालाड पूर्वेकडील स्टेशन आणि रुद्र ढोल-ताशा पथकानं गोरेगाव स्टेशन, रहेजा कॉम्प्लेक्स या परिसरात शनिवारी संध्याकाळी वादन केलं. वादनादरम्यान ढोल-ताशा पथकातील शिलेदारांनी आर्मी वेलफेअर फंड अंतर्गत निधी जमवून देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांना एक मदतीचा हात देण्याचं आवाहनही नागरिकांना केलं. या आवाहनाला नागरिकांनी पाठिंबा देत आपापल्या परीनं आर्थिक मदत केली. या वेळी १६ ढोल-ताशा पथकानं गोरेगाव, मालाड, चारकोप याठिकाणी वादन केलं.

पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाईचा निषेध म्हणून पथकाने गणवेष न घालता काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून वादन केले. या वेळी बघ्यांनी स्टेशन परिसरात गर्दी केली होती.

Loading Comments