Advertisement

बाप्पा मोरया! यंदाही गणेशोत्सव मंडळांचा आरोग्य उपक्रमांवर भर

साधेपणानं उत्सव साजरा करून अधिक आरोग्य उपक्रम राबवण्याकडे बहुतांश मंडळांचा प्रयत्न आहे.

बाप्पा मोरया! यंदाही गणेशोत्सव मंडळांचा आरोग्य उपक्रमांवर भर
SHARES

गणेशोत्सवा दरम्यान भव्यदिव्य देखावे उभारणे ही मुंबईतल्या जुन्या मंडळांची खासियत आहे. पण कोरोनामुळे यंदा उत्सवांवर निर्बंध आले आहेत. राज्य सरकारच्या आदेशाचं पालन करत जुन्या मंडळांनी देखील ४ फुट उंचीपर्यंतच्या मूर्तींना अधिक पसंती दिली आहे.

गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षी देखील छोट्या मूर्तींना अधिक पसंती दिली. मोठ्या मोठ्या मंडळांनी साधेपणानं गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पण या मंडळांचा कल आरोग्य उपक्रम घेण्याकडे अधिक आहे.  

लालबागचा राजा आणि जीएसबी वडाळा यांच्यासह काही आयोजकांनी, २०२० मध्ये देखील साध्या पद्धतीनं गणेशोत्सव साजरा केला होता. सध्या परिस्थितीशी जुळवून यावर्षी देखील अनेक मंडळांचा कल हा साध्या पद्धतीनं उत्सव साजरा करण्याकडे आहे.

लालबाग, टिळक नगर, चेंबूर मधील गणेश गल्ली आणि अखिल चंदनवाडी, मरीन लाईन्स, यांनी मूलभूत सजावटीसह सुंदर ४ फूट मुर्तीची रचना केली आहे. ते मोठ्या आगमन आणि विसर्जन मिरवणुका देखील टाळणार आहेत. भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था केली आहे.

१०२ वर्षीय चिंचपोकळीचा चिंतामणी चांदीच्या मूर्तीची पूजा करेल. लालबाग-परेल पट्ट्यातील हे सर्वात जुने मंडळ आहे आणि सर्जनशील मोठ्या मूर्ती आणि भव्य महाल किंवा मंदिराच्या मोठ्या सेटसाठी प्रसिद्ध आहे.

गणेश गल्लीतील ९४ वर्षांचा लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी त्याच्या मूर्तीचे अनावरण करेल. सचिव स्वप्नील परब म्हणाले की, ते वैद्यकीय आणि आरोग्य कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करत आहेत.

चेंबूरच्या टिळक नगरातील सह्याद्री क्रीडा मंडळाचा उत्सव आपला ४६ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. “गेल्या वर्षी, आम्ही आमच्या गोल मैदानाऐवजी वृंदावन सोसायटीतील कार्यालयात उत्सव आयोजित केला होता. आमच्या मूर्तीचा आकार ४ फूट होता आणि आम्ही सर्व सरकारी निर्देशांचे पालन केले, ”

मंडळाच्या उपाध्यक्ष जया शेट्टी म्हणाल्या. "या वर्षी सुद्धा आमची मुर्ती फक्त ४ फूट उंचीची आहे आणि आम्ही रहिवाशांकडून कोणतीही देणगी मागितली नाही. आम्ही रक्तदान शिबीर आयोजित करण्याची योजना आखत आहोत."

सह्याद्रीच्या मूर्तीचं विसर्जन फुलांच्या बेडके कृत्रिम तलावामध्ये केलं जाईल जे साइटवर तयार केलं गेलं आहे.

मरीन लाईन्समध्ये, शिवसेना नेते पांडुरंग सकपाळ यांच्या नेतृत्वाखालील अखिल चंदनवाडी गणपती मंडळ, त्याच्या सरासरी १५-२० फूट उंचीच्या मुर्तींसाठी ओळखलं जातं.

“या वर्षी आम्ही ४ फूट मूर्ती बसवू. आम्ही एसआरसीसी हॉस्पिटल, महालक्ष्मी इथं मुलांसाठी मोफत तपासणीची व्यवस्था करून आरोग्य कल्याण कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करत आहोत. आम्ही नेत्र शिबिरेही घेतली आहेत. आमच्या दक्षिण मुंबई सेना विभागानं आधीच २५ हजार लोकांना मोफत लसीकरण केलं आहे आणि पुढील फेरी १६ आणि १७ सप्टेंबरला होणार आहे, ”सकपाल म्हणाले.

एकूणच बाप्पाच्या पूजनासोबतच यावर्षी मंडळांचा सामाजिक कार्यात अधिक हातभार आहे. या मंडळांनी सामाजिक कार्याचा निवडलेला मार्ग इतर मंडळांनी देखील अवलंबवावा.



हेही वाचा

लालबाग, परळमध्ये भक्तांना 'नो एन्ट्री', कोरोनामुळे निर्बंध

गणेश विसर्जनासाठी ठाण्यात ऑनलाईन तारीख, वेळ बुकिंग करावी लागणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा