Advertisement

चला घाटकोपरला... किल्ले बघायला


चला घाटकोपरला... किल्ले बघायला
SHARES

घाटकोपर - येथील भटवाडी, रामजीनगर आणि सिद्धार्थनगरमध्ये दिवाळीनिमित्त किल्ले साकारण्यात आले आहेत. भटवाडीमधील अनेक मंडळांनी आपापल्या भागात किल्ले बांधले आहेत. एकता मित्र मंडळ, नव युग क्रीडा मंडळ, न्यू कमलदीप सेवा संघ आणि थ्री इलेव्हन स्पोर्टस क्लब या मंडळांनी किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या आहेत. अजिंक्यतारा, कर्नाळा, प्रतापगड आणि शिवनेरी असे किल्ले साकारून शिवाजी महाराजांचा इतिहास जतन करण्याचा प्रयत्न या मंडळांनी केला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा