Advertisement

१६ फेब्रुवारीला मुंबईत ‘जेरूसलेम-मुंबई महोत्सव’

भारत (india) आणि इस्रायल (israel) मधील कलात्मक आणि सांस्कृतिक संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी जेरुसलेम-मुंबई महोत्सव (Jerusalem-Mumbai Festival) प्रथमच १५ फेब्रुवारी २०२० रोजी मुंबईत भरवला जाईल.

१६ फेब्रुवारीला मुंबईत ‘जेरूसलेम-मुंबई महोत्सव’
SHARES

भारत (india) आणि इस्रायल (israel) मधील कलात्मक आणि सांस्कृतिक संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी जेरुसलेम-मुंबई महोत्सव (Jerusalem-Mumbai Festival) प्रथमच १६ फेब्रुवारी २०२० रोजी मुंबईत भरवला जाईल. जेरुसलेम नगरपालिकेतर्फे मुंबईत इस्रायलचे वाणिज्य दूतावास आणि फेडरेशन ऑफ इंडिया-इस्राईल चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.  इस्त्रायली सिनेमाचा मागील वर्षाचा सर्वात यशस्वी चित्रपट 'द मोसाद' जेरुसलेम-मुंबई महोत्सवात प्रदर्शित होईल.

जेरूसलेम-मुंबई उत्सवात या दोन्ही शहरांच्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडेल. दिवसभर दोन्ही संस्कृतींच्या खाद्यसंस्कृती, संगीत व नृत्यकलांचे सादरीकरण होईल. या उत्सवाचे उद्घाटन सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख आणि जेरूसलेमचे महापौर मोश लियोन यांच्याहस्ते होणार आहे.

या चित्रपटाच्या प्रदर्शनाला चित्रपट दिग्दर्शक अलोन गुर आर्येदेखील हजेरी लावतील आणि त्यानंतर ते तिथे उपस्थित प्रेक्षकांशी संवाद साधतील. जेरुसलेम-मुंबई फेस्टिव्हल (Jerusalem-Mumbai Festival) मध्ये आपली अनोखी सांस्कृतिक परंपरा तसेच मुंबई आणि जेरूसलेम या दोन शहरांमधील खास दुव्यांचं प्रदर्शन केलं जाईल. जेरुसलेम नगरपालिकेचा मुंबईतील हा पहिला सांस्कृतिक कार्यक्रम आहे. या महोत्सवात दोन्ही देशांमधील विशेष संबंध दाखवले जाणार असून भारत आणि इस्रायलमधील संबंधांना प्रोत्साहित करण्याचे उद्दिष्ट या महोत्सवाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्राहलयाच्या सभागृहात हा महोत्सव होईल.  १६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत हा महोत्सव असेल. हेही वाचा -

'अंग्रेजी मीडियम' ट्रेलरच्या आधी इरफानचा भावूक व्हिडिओ

'कभी ईद कभी दीवाली'मध्ये सलमानखानसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा