भांडुपमध्ये वधु-वर मेळावा

 Kandivali
भांडुपमध्ये वधु-वर मेळावा

कोकणनगर - भांडुप पश्चिमेकडील टेंभीपाडा रोडवर असलेल्या मराठा क्षत्रिय विद्यावर्धक मंडळाने शतक महोत्सवी वर्षाचे निमित्त साधून वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा परिचय मेळावा रविवार २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार ते रात्री आठ वाजेपर्यत असणार असून संस्थेच्या सभागृहात याचे आयोजन करण्यात आले . आरमारी मराठा आणि गाबित समाजातील तरूण-तरूणींसाठी खास करून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी अधिकाधिक तरूण- तरूणींनी या मेळाव्याला आपली उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन मधुचंद्र विवाह संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिश्चंद्र वस्त यांनी केले आहे.

Loading Comments