रामलीलेमधून रामकथेचा उलगडा

 Malad
 रामलीलेमधून रामकथेचा उलगडा

रामायण... वाल्मिकी ऋषींनी लिहिलेले हे महाकाव्य. हे काव्य राम आणि सीता यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. चौदा वर्षांचा वनवास आणि विरह यावर भाष्य करणारे नाटक मालाडमधल्या रामलीला प्रचार समितीने सादर केले. गेले 35 वर्ष रामलीला प्रचार समिती नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने रामलीला नाटकाचे आयोजन करते.

आजच्या आधुनिक काळात रामलीला नाटकाचे आयोजन क्वचितच केले जाते. "तरूणांना रामलीलेचा अर्थ उलगडावा, हा नाटक सादरीकरणाचा उद्देश आहे," असे रामलीला प्रचार समितीचे अध्यक्ष देवकीनंदन जिंदल यांनी म्हटले.

Loading Comments