Advertisement

६९व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा! शिवाजी पार्कमध्ये पथसंचलनाचा उत्साह!

शिवाजी पार्कवर मोठ्या उत्साहात ध्वजवंदना झाल्यानंतर पथसंचलन आणि विविध विभागांच्या चित्ररथांचं सादरीकरण झालं.

६९व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा! शिवाजी पार्कमध्ये पथसंचलनाचा उत्साह!
SHARES

संपूर्ण भारतात ६९वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. राजधानी दिल्लीमध्ये सकाळपासूनच प्रजासत्ताक दिन संचलनाचा उत्साह पहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह सर्वपक्षीय वरीष्ठ नेते आणि मंत्रीमंडळ दिल्लीच्या राजपथावर संचलनासाठी उपस्थित आहे.




शिवाजी पार्कमध्ये चित्ररथांचा उत्साह!

प्रजासत्ताक दिनाचा जसा दिल्लीत उत्साह आहे, तसाच तो मुंबईतही पहायला मिळत आहे. मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये दरवर्षीप्रमाणे वेगवेगळे शासकीय विभाग, परिमंडळ आणि महामंडळांनी आपापले चित्ररथ संचलनात सहभागी केले होते. त्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फिटले. आपल्या चित्ररथांच्या माध्यमातून अनेक सामाजिक संदेश देत हे पथसंचलन मार्गस्थ झाले.







हेही वाचा

हा नक्की कितवा प्रजासत्ताक दिन? सरकारी विभागानं केली 'ही' चूक!


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा