राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन

माटुंगा - रविवार.. सुट्टीचा वार... मात्र या सुट्टीच्या दिवशी मांटुग्यातल्या महिलांना खास महिला साहित्य संमेलनाची पर्वणी मिळाली. ऋजुता फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीनं हे खास एकदिवसीय संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. या साहित्य संमेलनात साहित्य क्षेत्रात योगदान देणाऱ्या राज्यभरातल्या महिलांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षण ठरल्या, त्या सिंगापूरहून आलेल्या लेखिका मोहना कारखानीस. एवढंच नाही तर या साहित्य संमेलनात इतर क्षेत्रातील महिलांनीही हजेरी लावली. ऋजुता फाउंडेशनच्या पुरस्काराचं आणि साहित्य संमेलनाचं हे जरी पहिलंच वर्ष असलं, तरी रसिकांनी त्याला भरभरून दाद दिली.

Loading Comments 

Related News from संस्कृती