Advertisement

सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी ऑनलाइन नोंदणी बंधनकारक


सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी ऑनलाइन नोंदणी बंधनकारक
SHARES

जवळपास ७ ते ८ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अखेर दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरं पुन्हा खुली करण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली. या घोषनेनंतर पुन्हा एकदा देवाच्या दारी जाऊन भाविकांना दर्शन घेता येणार आहे. विशेष म्हणजे सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांना ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासानं तयार केलेल्या 'अ‍ॅप'वर पूर्वनोंदणी केल्यावर क्यूआर कोड मिळणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात येताना भाविकांनी मास्क लावणं, सोशल डिस्टनसिंग पालन करणं, आरोग्य सेतू ऍप वापरणं आवश्यक असून, कोरोनाच्या नियमांचं पूर्ण पालन करणं अशा अटी राज्य सरकारकडून लागू करण्यात आल्या आहेत. मंदिरं खुली करण्याची परवानगी देण्यात आलेली असली तरीही कोरोनापासून बचावासाठी शक्य त्या सर्व परिंनी काळजी घेतली जाणार आहे. 

राज्य सरकारनं सोमवारपासून प्रार्थनास्थळे उघडण्यास परवानगी दिल्यानं सर्व प्रमुख धर्मस्थळांच्या व्यवस्थापनांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करून भाविकांना प्रवेश देण्याची तयारी केली आहे. सिद्धिविनायक मंदिरातील प्रवेशासाठी पूर्वनोंदणी बंधनकारक असणार आहे. सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने तयार केलेल्या 'अ‍ॅप'वर पूर्वनोंदणी केल्यावर क्यूआर कोड मिळणार आहे. एका तासात शंभर भाविकांनाच दर्शन घेता येणार आहे. 

दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याची नोंद प्रणालीवर झाल्यास त्या नागरिकाला प्रवेश देण्यात येणार आहे. दिवसभरात एक हजार नागरिकांना दर्शन घेता येईल, अशी माहिती न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा