Advertisement

मोहरम म्हणजे काय? - सांगताहेत शिक्षक भारतीचे सलीम शेख


मोहरम म्हणजे काय? - सांगताहेत शिक्षक भारतीचे सलीम शेख
SHARES

इस्लाम धर्मियांच्या हिजरी संवत या वर्षातील पहिला महिना म्हणजेच मोहरम. इ.स. 680 मध्ये मोहरमच्या दहाव्या दिवशी हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसेन आणि हुसैन हे दोघेही करबला येथे शहीद झाले होते. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मुस्लिम बांधव या दिवशी शोक व्यक्त करतात.युद्धात हसेन हुसेन शहीद

हजरत मोहम्मद पैगंबर यांची मुलगी बीबी फातिमा यांची हसेन आणि हुसेन ही दोन्ही मुले होती. इराकची राजधानी असलेल्या बगदादमधील करबला या गावात तारीख-ए-इस्लाम हे ऐतिहासिक युद्ध झाले होते. त्यावेळी या दोघांनी इस्लाम धर्माचा कायापालट करण्यासाठी हे युद्ध केले होते.


यामुळे झाले युद्ध

खरेतर इस्लाम धर्मातील पाचवा खलिफा असलेल्या अमीर मुआविया यांनी आपला कार्यकाळ संपल्यानंतर त्या पदासाठी त्यांचा मुलगा यजिदला उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केले होते. या नियुक्तीला इस्लाम धर्मियांचा विरोध होता. कारण त्यावेळी यजिदची ओळख ही गुंड म्हणून होती. त्याच्यामुळेच युद्धाची परिस्थिती निर्माण झाली. अखेर हे युद्ध करबलामध्ये झाले.

 


या युद्धात हसेन आणि हुसेन यांचे फक्त 72 सैनिक होते. तर तिकडे यजिद मुआविया याचे 40 हजार सैनिक होते. या यजिदाचा सामना करताना हसेन आणि हुसेन दोघेही शहीद झाले. ज्या दिवशी ते शहीद झाले त्या दिवसाला ‘यौमे आशुरा’ असे म्हणतात. त्याच दिवशी मुस्लिम बांधव हसेन आणि हुसेन यांच्या आठवणीत शोक व्यक्त करतात. 

या युद्धानंतर मुस्लिम धर्माचे शिया आणि सुन्नी अशा दोन गटात विभाजन झाले. हसेन आणि हुसेन ज्या ठिकाणी शहीद झाले तेथेच म्हणजे करबलामध्ये त्यांची कबर बांधण्यात आली.


शिया समाजातील तैमुरलंग जो हसेन आणि हुसेन यांना मानणारा होता. जो उपर्वेकोचितमधून लढाई करून भारतावर अधिराज्य गाजवण्यासाठी आला होता. पण काही काळानंतर तो भारतातच स्थायिक झाला. मोहरमच्यानिमित्ताने तो नेहमी करबलाला जात असे. पण वृद्धापकाळातील आजारपणामुळे त्याला करबलाला जाणे शक्य नव्हते. त्यामुळे त्याने कारागिराला बोलावून हसेन हुसेन यांची प्रतिकृती म्हणून ताजियाची निर्मिती केली आणि त्याची पूजा अर्चा करून त्याचे विसर्जन केले. त्यानंतर ही प्रथा भारतात सुरू झाली. भारतासह पाकिस्तान आणि म्यानमारमध्ये मोहरमच्या दिवशी शोक व्यक्त केला जातो.
- सलीम शेख, उपाध्यक्ष, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ (महाराष्ट्र) आणि शिक्षक भारती संघटना


हेही वाचा - 

मुंबईकर म्हणतायत ईद मुबारक!

जाणून घ्या 'बकरी ईद'चा खरा अर्थ!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा