Advertisement

मुंबईकर म्हणतायत ईद मुबारक!


मुंबईकर म्हणतायत ईद मुबारक!
SHARES

देशभरात सोमवारी मुस्लिम बांधव ईद-उल-फित्र म्हणजेच रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करत आहेत. या दिवशी मुस्लिम बांधव मशिदीत जाऊन सर्वप्रथम नमाज अदा करतात. रमजानचा महिन्याभराच्या रोजा ठेवल्यानंतर रविवारी संध्याकाळी चंद्र दिसला. त्यानंतर सोमवारी रमजान ईद साजरी होणार असल्याची घोषणा मरकजी चांद समितीचे अध्यक्ष मौलाना खालीद राशीद फिरंगी महली यांनी केली.


शहर, उपनगरात ईदचा उत्साह

कुर्ल्यात देखील सकाळी मुस्लिम बांधवांनी हजारोंच्या संख्येत ईदनिमित्त सामूहिक नमाज अदा केली. कुर्ला हा मुस्लिम बहुल विभाग असल्याने आणि मस्जिदमध्ये एकाच वेळी सर्वांना प्रार्थना करता येत नसल्याने कुर्ला स्टेशनच्या बाहेर यावेळी प्रार्थना करण्यात आली. मौलाना झुलफेकार यांनी सर्वांना ईदनिमित्त संबोधून भारतात सुख शांती नांदण्याची प्रार्थना केली. यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याशिवाय डोंगरी, वांद्रे, मस्जिद बंदर, जोगेश्वरी, गोवंडी या मुस्लिमबहुल भागतही मोठ्या उत्साहात ईद साजरी करण्यात आली.



जाणून घ्या रमजान ईदचे महत्त्व

वर्षभरात दोनवेळा ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यातील पहिल्या ईदला 'ईद-उल-फित्र' आणि दुसऱ्या ईदला 'ईद-उल जुहा' असे म्हटले जाते. 'ईद-उल-फित्र' हा अरबी भाषेतील शब्द आहे. ईद या शब्दाचा अर्थ 'आनंद' आणि 'फित्र' म्हणजे दान करणे. मुस्लिम धर्मातल्या तळागाळातील प्रत्येक व्यक्तीला ईदच्या पावन पर्वाचा आनंद घेता यावा, यासाठी 'जकात' आणि 'फित्र'ची तरतूद मुस्लिम शरियत कायद्यामध्ये करण्यात आली आहे. 'जकात' हे ईदच्या आधी दिले जाते.


रमजान हा हिजरी वर्षाचा नववा महिना आहे. 'रमज' म्हणजे जळणे किंवा जाळणे. पापाला जाळणारा महिना म्हणून रमजान असे या महिन्याला म्हटले जाते. रमजान महिना हा रोजांचा म्हणजेच उपवासांचा महिना असतो. इस्लाम धर्माची इमारत ज्या पाच स्तंभावर उभी आहे, त्यापैकी रोजा हा एक प्रमुख आहे.

- सलिम शेख, उपाध्यक्ष, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ (महाराष्ट्र) आणि शिक्षक भारती संघटना





हे देखील वाचा - 

खजुराने वाढवली रमजानची गोडी



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा