Advertisement

मुंबई शहराचे मतदार घटले


मुंबई शहराचे मतदार घटले
SHARES

वरळी : मुंबई शहर जिल्ह्यातील मतदार याद्यांचा पुर्ननिरीक्षण कार्यक्रम बुधवारी मुंबई शहर जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला. त्यांनी जाहीर केलेल्या मुंबई शहराच्या मतदार आकडेवारीनुसार मुंबईचे मतदार घटले असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई शहरात 2012 ला झालेल्या जनगणनेनुसार 30 लाखांच्या आसपास मतदार संख्या होती,मात्र हीच मतदार संख्या दोन मतदार संघात विभागली गेल्यामुळे घटल्याचे उपजिल्हाधिकारी आणि मुंबई शहर निवडणूक अधिकारी अपर्णा सोमानी यांनी सांगितले. मुंबई शहर जिल्ह्यातील एकूण मतदार 23 लाख 95 हजार 695 इतके असून यात पुरुष मतदार संख्या 13 लाख 18 हजार 216 आणि स्त्री मतदार संख्या 10 लाख 77 हजार 396 इतके आहेत. पुरवणी यादीसह 16 ऑक्टोबरपासून प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली असून ती सर्व नागरिकांना पाहण्यासाठी विधानसभा मतदारसंघाची मध्यवर्ती कार्यालये तसेच पदनिर्देशित ठिकाणी आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे संकेतस्थळावर 16 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर दरम्यान उपलब्ध राहणार आहे. सदर कालावधीत मतदारांना नवीन नाव नोंदणी करणे, वगळणे, नाव, वय, लिंग आणि पत्ता यामध्ये दुरुस्ती करणे यासाठी नमुना फॉर्म भरुन ते विधानसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती कार्यालयात तसेच पदनिर्देशित ठिकाणी सादर करता येणार आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा