Advertisement

अजय देवगनच्या भोला चित्रपटाचा प्राइमवर खास प्रीमियर

अजय देवगन दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे

अजय देवगनच्या भोला चित्रपटाचा प्राइमवर खास प्रीमियर
SHARES

प्राइम व्हिडिओने 'भोला' या हिंदी अॅक्शन-अ‍ॅडव्हेंचर चित्रपटाच्या ग्लोबल स्ट्रीमिंग प्रीमियरची घोषणा केली. ही अॅक्शन फिल्म 25 मे पासून Amazon Prime Video वर पाहता येईल.

अजय देवगन दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगन मुख्य भूमिकेत आहे तर चित्रपटात त्याच्यासोबत तब्बू आणि अमला पॉल आहेत.

भोला ही एका माजी दोषीची कथा आहे जो दहा वर्षांच्या तुरुंगवासानंतर मुक्त होतो आणि त्याला आपल्या मुलीला पुन्हा भेटायचे आहे. अनेक वर्षांपासून त्याने आपल्या मुलीला पाहिले नाही. मात्र, या सगळ्यामध्ये असे काही घडते की तो पोलिस आणि माफिया यांच्यातील युद्धाचा एक भाग बनतो.

घटना उलगडत असताना भोलाला त्याच्या भूतकाळाला सामोरे जावे लागते. अशा प्रकारे अजय देवगनच्या भोलामध्ये दमदार अॅक्शन पाहायला मिळते.

अजय देवगनच्या भोलाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 90 कोटींची कमाई केली. भोलामध्ये अजय देवगनसोबत तब्बू, दीपक डोबरियाल, संजय मिश्रा, मकरंद देशपांडे, गजराज राव आणि अमला पॉल यांसारखे अनेक दिग्गज कलाकार मुख्य भूमिकेत होते. भोलाचे बजेट जवळपास 100 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

अजय देवगनचा 'भोला' चित्रपट 30 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 11.2 कोटींची ओपनिंग केली होती, पण लवकरच अजय देवगनच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार सुरुवात केली. भोला हा साऊथचा सुपरहिट चित्रपट कैथीचा रिमेक आहे. साऊथचा सुपरस्टार कार्ती कैथीमध्ये दिसला आहे.



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा