Advertisement

'दुनिया हिला देंगे हम'चा सूर आळवणार 'मुंबई इंडियन्स'ची डॉक्यूमेंट्री

१९८३ मध्ये भारतीय क्रिकेट संघानं माजी कर्णधार कपील देव यांच्या नेतृत्वाखाली जिंकलेल्या विश्वचषकाची आठवण करून देणारा '८३' हा चित्रपटही बनत आहे. याच क्रिकेटमय वातावरणात आता 'इंडियन प्रिमियर लीग'मधील (आयपीएल) सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्स या संघावर डॉक्यूमेंट्री तयार केली जात आहे.

'दुनिया हिला देंगे हम'चा सूर आळवणार 'मुंबई इंडियन्स'ची डॉक्यूमेंट्री
SHARES

बॉलिवूडमध्ये सध्या विविध खेळाडूंच्या जीवनावर आधारित बायोपिक बनवले जात आहेत. त्यातच, १९८३ मध्ये भारतीय क्रिकेट संघानं माजी कर्णधार कपील देव यांच्या नेतृत्वाखाली जिंकलेल्या विश्वचषकाची आठवण करून देणारा '८३' हा चित्रपटही बनत आहे. याच क्रिकेटमय वातावरणात आता 'इंडियन प्रिमियर लीग'मधील (आयपीएल) सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्स या संघावर डॉक्यूमेंट्री तयार केली जात आहे.


आयपीएलमधील प्रवास

नेटफ्लिक्सची निर्मिती असलेली ही डॅाक्युमेंट्री ‘Cricket Fever: Mumbai Indians’ या नावाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आठ भागांच्या या डॅाक्युमेंट्रीमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा आयपीएलमधील प्रवास दाखवण्यात येणार आहे. मंगळवारी याबाबत नेटफ्लिक्सनं ट्वीटरवरून अधिकृत घोषणा केली आहे. १ मार्च रोजी या डॉक्युमेंट्रीचा पहिला भाग प्रसारीत होणार आहे.




'दुनिया हिला देंगे हम'

'दुनिया हिला देंगे हम' या ब्रीदवाक्यासह ही डॉक्युमेंट्री प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आठ भागांच्या या डॉक्यूमेंट्रीमध्ये आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या २०१३, २०१५ आणि २०१७ या तीन जेतेपदांचा प्रवास आहे. यासोबतच मैदानाबाहेरील काही रोमांचक प्रसंगांवरही अधिक भर देण्यात आला आहे. सामना सुरु होण्यापूर्वी खेळाडूंवर असलेलं दडपण, मैदानातील चाहत्यांसह संपूर्ण मुंबईकराच्या अपेक्षांवर खरं उतरण्यासाठी त्यांची असलेली धडपड, सामना जिंकण्यासाठीची तळमळ यांसारख्या अनेक गोष्टी या डॉक्युमेंट्रीमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे या डॉक्युमेंट्रीला मुंबईकरांसह क्रिकेटप्रेमींकडून कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.



हेही वाचा -

दिव्यांग व्यक्तीकडूनच साथिदाराची फसवणूक

१० नव्हे १५ महिन्यात उभारणार लोअर परळचा पुल!



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा