Advertisement

दहावीच्या उत्तरपत्रिका सापडल्या रस्त्यावर! मुंबईत खळबळ!

शनिवारी मुंबईच्या पूर्व द्रुतगती मार्गावर दहावीच्या उत्तरपत्रिका भरस्त्यावर पडलेल्या सापडल्या आहेत. सदर प्रकरणाची चौकशी करत असल्याची माहिती मुंबई विभागीय शिक्षण मंडळाकडून मिळाली आहे.

दहावीच्या उत्तरपत्रिका सापडल्या रस्त्यावर! मुंबईत खळबळ!
SHARES

सध्या दहावीच्या परीक्षा सुरु आहे. अशातच एक दोन नाही, तर दहावीच्या उत्तरपत्रिकांचा आख्खा संचच रस्त्यावर पाहायला मिळाला तर? सामान्य पालक आणि विद्यार्थ्यांच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. मात्र, असा प्रकार घडला असून शनिवारी मुंबईच्या पूर्व द्रुतगती मार्गावर दहावीच्या उत्तरपत्रिका भरस्त्यावर पडलेल्या सापडल्या आहेत. सदर प्रकरणाची चौकशी करत असल्याची माहिती मुंबई विभागीय शिक्षण मंडळाकडून मिळाली आहे.



बेवारस उत्तरपत्रिका, शाळेचा शोध

शनिवारी पूर्व द्रुतगती मार्गावर दहावीच्या उत्तरपत्रिकांचा खच रस्त्याच्या बाजूला बेवारस अवस्थेत सापडल्याने लोकांमध्ये एकाच खळबळ उडाली. याची माहिती तात्काळ मुंबई विभागीय शिक्षण मंडळाला देण्यात आली. या उत्तरपत्रिका कोऱ्या असल्या, तरी शिक्षण मंडळाच्या उत्तरपत्रिका रस्त्यावर पडल्याने संबंधित शाळा आणि शिक्षण मंडळाचा ढिसाळ कारभार यामधून समोर आल्याच्या चर्चा होत आहेत.


उत्तर पत्रिका मागच्या वर्षीच्या?

यासंबंधी मुंबई शिक्षण मंडळाला संपर्क केला असता या उत्तरपत्रिका मागच्या वर्षीच्या असून यंदाच्या उत्तरपत्रिकांचा नमुना वेगळा आहे. तसंच, यावर्षी उत्तरपत्रिकांवर बारकोड स्कॅनिंगची सुविधाही आहे. तरी या उत्तरपत्रिका मंडळ ताब्यात घेत आहे. याची चौकशी आणि तपास करून संबंधित शाळेला विचारणा केली जाईल, अशी माहिती मुंबई विभागीय मंडळाचे अध्यक्ष अनिल बोरसे यांनी दिली. उत्तरपत्रिकेवरील माहितीवरून संबंधित शाळेचा शोध घेतला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.



हेही वाचा

१०वी -१२वीचं टेन्शन आलंय? मग इथे कॉल करा आणि टेन्शन फ्री व्हा!


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा