Advertisement

राज्यातल्या १२वीच्या परीक्षा अखेर रद्द!

राज्यातल्या १२वीच्या परीक्षा आता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातल्या १२वीच्या परीक्षा अखेर रद्द!
SHARES

राज्यातल्या १२वीच्या परीक्षा आता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षा रद्द करण्याच्या शासनाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. गुरूवारी झालेल्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettivar) यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत बारावीच्या परीक्षांबाबत चर्चा झाल्याचं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (varsha gaikwad) यांनी सांगितलं होतं. मात्र, त्याबाबत कोणताही निर्णय झाला नव्हता. 'शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन विभागाला ही फाईल पाठवत आहोत. आज किंवा उद्या त्यांची बैठक होईल. त्यात ते फाईलवर निर्णय घेतील आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला अतिरिक्त माहिती देऊ. सध्याच्या कोविडच्या परिस्थितीमध्ये सर्व निर्णय हे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून घेतले जात आहेत. त्यानुसार आम्ही ती फाईल त्यांच्याकडे पाठवली आहे', असं बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना गायकवाड यांनी सांगितलं.

आता या प्रस्तावाला आपत्ती व्यवस्थापन विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे बारावीच्या परीक्षा रद्द करण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. परीक्षा रद्द करण्याची भूमिका आमची पहिल्यापासूनच होती असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं.



हेही वाचा -

देशभरात लसीकरणामध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक

शुभवार्ता! केरळमध्ये दाखल होतोय मान्सून


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा