२१ विद्यार्थिनी करणार काश्मीर ते कन्याकुमारी सायकलस्वारी

२२ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीत विद्यार्थिनींनी सायकल मोहीम आयोजित केली आहे.

२१ विद्यार्थिनी करणार काश्मीर ते कन्याकुमारी सायकलस्वारी
SHARES

घाटकोपर येथील पी. एन. दोशी महिला कॉलेज यंदा हीरक महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. या काॅलेजला ६० वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त काॅलेजच्या २१ विद्यार्थिनी काश्मीर ते कन्याकुमारी अशी सायकल भ्रमंती करणार आहेत. 

२२ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीत या विद्यार्थिनींनी सायकल मोहीम आयोजित केली आहे. यामध्ये त्या ७ राज्यांतून ३७०० किमी अंतराची भ्रमंती करणार आहेत. काॅलेजने ही सायकल मोहीम आयोजीत केली असल्याचं  कॉलेजच्या प्राचार्य डॉ. आशा मेनन यांनी सांगितलं. एसपीआरजे कन्याशाळा ट्रस्टने सन १९६० मध्ये पी. एन. दोशी महिला कॉलेजची स्थापना केली. यावेळी बीएला फक्त ५ विद्यार्थिनी होत्या. आता या काॅलेजमध्ये ५ हजार विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. 

केंद्र सरकारची 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' ही मोहीम या ट्रस्टने आधीपासूनच अंगिकारली आहे. बेटी बचाओ, बेटी पढाओ हा संदेश पी. एन. दोशी काॅलेज काश्मीर ते कन्याकुमारी या सायकल मोहिमेतून देणार असल्याचं डॉ. आशा मेनन यांनी सांगितलं. जम्मू येथून २२ नोव्हेंबरला  या मोहिमेचा प्रारंभ होईल.  त्यासाठी या विद्यार्थिनी गेल्या काही दिवसांपासून कसून सराव करत आहेत. कॉलेजचे दहा कर्मचारीही या मोहिमेत विद्यार्थिनींसोबत असतील.हेही वाचा -

बनावट तिकीट तपासनीसाला दादर स्थानकात अटक

सीसीटिव्ही कक्षाचे काम सुरळीत, मुंबई पोलिसांकडून खुलासा
संबंधित विषय