Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
51,79,929
Recovered:
45,41,391
Deaths:
77,191
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
40,162
1,717
Maharashtra
5,58,996
40,956

पालिका क्षेत्रात २११ बोगस शाळा

मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने पालिका हद्दीतील तब्बल २११ अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली असून या सर्व शाळा तातडीने बंद कराव्यात असे आदेश पालिका शिक्षण विभागाने दिले आहेत.

पालिका क्षेत्रात २११ बोगस शाळा
SHARES

मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने पालिका हद्दीतील तब्बल २११ अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली असून या सर्व शाळा तातडीने बंद कराव्यात, असे आदेश पालिका शिक्षण विभागाने दिले आहेत. त्याशिवाय या शाळेत प्रवेश घेतलेल्या सर्व पालकांनी त्यांच्या पाल्यांना मान्यताप्राप्त शाळेत दाखल करावं असं आवाहनही शिक्षणधिकाऱ्यांतर्फे करण्यात आलं आहे. 


गोवंडीत सर्वाधिक शाळा

दरवर्षीप्रमाणे यंदाही पालिका शिक्षण विभागातर्फे अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आली  आहे.  यंदा पालिकेच्या शिक्षण विभागाने २११ शाळा बोगस ठरवल्या आहेत. गेल्या वर्षी या यादीत २३१ शाळांचा समावेश होता. त्या तुलनेत ही संख्या कमी असली तरी देखील ही संख्या चिंताजनक आहे. पालिकेने बोगस ठरवलेल्या शाळांमध्ये बहुतांश शाळा इंग्रजी माध्यमाच्या असून त्यासोबतच हिंदी, मराठी, उर्दू या तीन माध्यमांच्या अनेक शाळाही यामध्ये आहेत. विशेष बाब म्हणजे या बोगस शाळांमधील सर्वात जास्त शाळा गोवंडी परिसरात असल्याचं उघड झालं आहे. 


कायदा काय सांगतो ?

शिक्षण हक्क कायदानुसार कोणतीही नवीन शाळा राज्य सरकार आणि पालिकेच्या मंजुरीशिवाय सुरू करता येत नाही. या नियमांकडं दुर्लक्ष केल्यास पालिका प्रशासनाला शाळा व्यवस्थापनावर दंडात्मक कारवाई करता येते. यानुसार पालिका शिक्षण विभाग पालिकेच्या हद्दीतील शाळांची तपासणी करून अधिकृत आणि अनधिकृत शाळा ठरवत असून अनधिकृत असलेल्या या शाळा तात्काळ बंद कराव्यात अशी कायद्यात तरतुद आहे. तसंच अनधिकृत ठरविण्यात आलेल्या शाळा व्यवस्थापनांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना नजीकच्या महापालिका किंवा अन्य मान्यताप्राप्त खासगी शाळेत पुढील शिक्षणासाठी दाखल करता येते. 


अशी आहे आकडेवारी 


विभागअनधिकृत शाळा
एफ दक्षिण 
एफ उत्तर१३

एच पूर्व

के पूर्व

४ 
के पश्‍चिम
पी पश्चिम
पी उत्तर
आर उत्तर 
आर मध्य 
आर दक्षिण
एल१४
एम पूर्व५६
एम पश्‍चिम ४ 
एफ दक्षिण
आर दक्षिण
एम पूर्व 
एन
आर उत्तर 


शाळा बंद होणार 

पालिकेने जाहीर केलेल्या या बोगस शाळांनी एप्रिलपर्यंत मान्यता प्राप्त प्रमाणपत्र शासनाकडं सादर करणं बंधनकारक आहे. ज्या शाळा हे प्रमाणपत्र सादर करणार नाहीत त्या शाळा बंद कराव्या लागतील, अशी माहिती शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिली. हेही वाचा -

११ लाख पदव्यांचा तपशील पडताळणीसाठी ऑनलाइन उपलब्ध

मुंबईतील विनाअनुदानित शिक्षिकांची मातोश्रीवर धडकRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा