Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
55,601
3,028
Maharashtra
6,39,075
62,194

कलिना कॅम्पसमध्ये विद्यार्थिनींसाठी कडेकोट सुरक्षा, बसवणार ३०० सीसीटीव्ही

२०१२ साली मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये सीसीटिव्ही लावणं गरजेचं असल्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यावेळी कलिना कॅम्पसमधील ६० इमारतींसाठी २९९ सीसीटिव्हीची गरज असल्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र, आजतागायत कलिना कॅम्पसमध्ये सीसीटिव्ही बसविण्यात आलेले नाहीत.

कलिना कॅम्पसमध्ये विद्यार्थिनींसाठी कडेकोट सुरक्षा, बसवणार ३०० सीसीटीव्ही
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये एका विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचं प्रकरण उघडकीस आल होतं. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठात जवळपास ३०० सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. तसंच  विद्यापीठाच्या सुरक्षेसाठी कलिना कॅम्पसमध्ये २ पोलिस चौकीही उभारण्यात येणार असल्याची घोषणाही विद्यापीठ प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.


विद्यार्थिनीचा विनयभंग 

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील रानडे भवनात ४ ऑगस्टला एका विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला होता. या प्रकरणानंतर विद्यापीठात काही ठिकाणी सीसीटीव्ही नसल्याचंही स्पष्ट झालं होतं. यावर अनेक विद्यार्थी संघटनांनी आक्रमक पवित्रा धारण करत विद्यापीठ प्रशासनाची भेट घेतली होती. या भेटीतील चर्चेदरम्यान कलिना कॅम्पसमध्ये २ पोलिस चौकी उभारण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. तसचं विद्यापीठात सर्वत्र सीसीटिव्ही कॅमरेही बसवण्यात येणार असून विद्यार्थिनीना स्वसंरक्षणाचे धडेही दिले जाणार असल्याचा निर्णय घेण्यात अाला होता.


सीसीटिव्ही बसवण्याकडं दुर्लक्ष

२०१२ साली मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये सीसीटिव्ही लावणं गरजेचं असल्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यावेळी कलिना कॅम्पसमधील ६० इमारतींसाठी २९९ सीसीटिव्हीची गरज असल्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र, आजतागायत कलिना कॅम्पसमध्ये सीसीटिव्ही बसविण्यात आलेले नाहीत. विशेष म्हणजे मुंबई विद्यापीठात कुलगुरूंचं निवासस्थान असून या ठिकाणीही सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत नसल्यानं विद्यापीठात कोणताही अनुचित प्रकार घडला तर त्याची माहिती पोलिस यंत्रणाना कळणार नाही. काही दिवसांपूर्वी मुंबई विद्यापीठात एका मुलीचा विनयभंग झालेला प्रकार लांच्छानास्पद आहे. त्याच पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसात ३०० सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. येत्या २ आठवड्यात सीसीटीव्ही बसवण्याच्या कामाला सुरूवात करण्यात येईल. तसंच पुढच्या आठवड्यात विद्यापीठातील विद्यार्थिंनीना स्वसंरक्षणाचे धडेही देण्यात येणार असून विद्यापीठाच्या वुमन डेव्हलपमेंट सेलमध्ये युवासेनेच्या महिला सिनेट सदस्याही कार्यरत आहेत.
- सुप्रिया कारंडे,  सिनेट सदस्या, युवा सेनाहेही वाचा -

आयटीआयला विद्यार्थ्यांची वाढती पसंती

आता अकरावी प्रवेशासाठी 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य'
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा