Advertisement

मुंबईतील शाळांमध्ये ४२ टक्के विद्यार्थ्यांनी लावली हजेरी

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बंद झालेल्या शाळा नव्या वर्षात पुन्हा एकदा सुरू झाल्या. सोमवार २४ जानेवारीपासून पुन्हा शाळेची घंटा वाजली.

मुंबईतील शाळांमध्ये ४२ टक्के विद्यार्थ्यांनी लावली हजेरी
SHARES

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बंद झालेल्या शाळा नव्या वर्षात पुन्हा एकदा सुरू झाल्या. सोमवार २४ जानेवारीपासून पुन्हा शाळेची घंटा वाजली. मुंबईतील तब्बल ३ हजार ८५० शाळा पुन्हा अनलॉक झाल्या आहेत. मुंबईतील १ली ते १२वीच्या तब्बल ९० टक्क्यांहून अधिक शाळांमध्ये ७ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी हजेरी लावल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईमध्ये महापालिका आणि उपसंचालक कार्यालयांतर्गत १ली ते १२वीमध्ये एकूण १६ लाख ३५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यापैकी ४१ टक्के विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी ऑफलाईन उपस्थिती लावली आहे. 

यामध्ये खासगी शाळांतील विद्यार्थ्यांची उपस्थिती ५० टक्क्यांहून अधिक होती तर पालिका शाळांतील विद्यार्थ्यांची उपस्थिती ही केवळ २९ टक्के दिसून आली. या उपस्थितीमध्ये हळूहळू वाढ होत जाईल अशी अपेक्षा शिक्षणाधिकारी यांनी व्यक्त केली आहे.

मुंबईसह राज्यातील वाढती रुग्णसंख्या पाहून १५ फेब्रुवारीपर्यंत सरकारने सरसकट शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं १५ डिसेंबर रोजीच सुरु झालेल्या मुंबईतील शाळा पुन्हा बंद कराव्या लागल्या.

२४ जानेवारीपासून स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन शाळा सुरु करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जारी केल्यावर मुंबईतील शाळाही सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे मुंबईतील ९० टक्क्यांहून अधिक शाळांनी वर्ग सुरु करून प्रतिसाद दिला.

उर्वरित काही खासगी व्यवस्थापन आणि केंद्रीय मंडळाच्या शाळा येत्या २ ते ३ दिवसांत सुरु होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शाळा सुरु करण्याच्या निर्णयानंतर पहिल्याच दिवशी मुंबईतील शिक्षकांची उपस्थिती ही उल्लेखनीय होती. उपसंचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये शिक्षकांची एकूण उपस्थिती ही जवळपास ९१ टक्के तर पालिका  शाळांमधील शिक्षकांची उपस्थिती ही ९७ टक्के होती.

जे विद्यार्थी अद्यापही ऑनलाईन शिक्षण घेत आहेत आणि प्रत्यक्ष शाळेत हजर नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी शिक्षक ऑनलाईन शिकवत आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा