Advertisement

प्रज्ञाशोध परीक्षेसाठी महाराष्ट्रातील ९२ विद्यार्थ्यांची निवड

दरवर्षीप्रमाणं यंदाही १३ मे रोजी राष्ट्रीय स्तरावरील प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आली होती. यंदाच्या या परीक्षेसाठी महाराष्ट्रातून ३८९ विद्यार्थी बसले होते. यातून केवळ ९३ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आली आहे.

प्रज्ञाशोध परीक्षेसाठी महाराष्ट्रातील ९२ विद्यार्थ्यांची निवड
SHARES

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेतून (राज्यस्तर) शिष्यवृत्तीसाठी महाराष्ट्रातून ९२ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यात ७१ विद्यार्थी आणि २१ विद्यार्थीनींचा समावेश आहे.


राज्यातून ३८९ विद्यार्थी

प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) यांच्यामार्फत राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा घेण्यात येते. राज्य व राष्ट्रीय स्तरावर ही परीक्षा घेण्यात येत असून फक्त दहावीतील विद्यार्थी या परीक्षेस पात्र ठरतात. दरम्यान दरवर्षीप्रमाणं यंदाही १३ मे रोजी राष्ट्रीय स्तरावरील प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आली होती. यंदाच्या या परीक्षेसाठी महाराष्ट्रातून ३८९ विद्यार्थी बसले होते. यातून केवळ ९३ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आली आहे.


कुठले विद्यार्थी?

शिष्यवृत्तीसाठी निवडण्यात आलेल्या ९२ विद्यार्थ्यांमध्ये राज्य अभ्यास मंडळाचे ३९ विद्यार्थी, सीबीएसई अभ्यासक्रमाचे ३९ विद्यार्थी व आयसीईएस अभ्यासक्रमाच्या २० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसंच इतर अभ्यासक्रमाच्या ४ विद्यार्थ्यांचाही या शिष्यवृत्तीमध्ये समावेश आहे.



हेही वाचा-

विद्यापीठाचं ग्रंथालय राहणार रात्री पावणेदहा वाजेपर्यंत खुलं

विनाअनुदानित शिक्षकांचं शाळा बंद आंदोलन



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा