नववीचे विद्यार्थी नव्या पुस्तकांच्या प्रतिक्षेत

  Mumbai
  नववीचे विद्यार्थी नव्या पुस्तकांच्या प्रतिक्षेत
  मुंबई  -  

  नववीला दहावीचा पाया मानला जातो. त्यामुळे अनेक शाळांमध्ये नववीचे वर्ग लवकर सुरू केले जातात. मात्र यावर्षी नववीची पुस्तकं बाजारात उपलब्ध नसल्याने विद्यार्थी आणि पालक त्रस्त झाले आहेत. खरंतर जून महिन्याच्या आत बाजारात पुस्तके येणे अपेक्षित होते. मात्र जून महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला तरी बाजारात नववीची पुस्तके आलेली नाहीत. विशेष म्हणजे यंदा सातवी आणि नववीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे नव्याने पुस्तके छापण्यात आली आहेत. दरम्यान, या सगळ्याचा परिणाम आता खासगी क्लासवर देखील होत आहे. त्यामुळे मुले अभ्यास सुरू कधी करणार? असा प्रश्न पालक सुमेधा जोशी यांनी उपस्थित केला आहे.


  हेही वाचा - 

  राज्यातील सर्व शाळा डिजिटल होणार - मुख्यमंत्री

  शाळांच्या मनमानीवर पालिकेचा लगाम

  सावधान...अनधिकृत इंग्रजी शाळांची संख्या वाढतेय!


  सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे इंग्रजी माध्यमाचे बिजगणित या एकाच विषयाचे पुस्तक सध्या बाजारात उपलब्ध आहे. तर मराठी माध्यमाची इतिहास, भूगोल, बिजगणित, भूमिती या विषयांची पुस्तके बाजारात आली आहेत. मात्र, भाषा विषयाचे एकही पुस्तक बाजारात आलेले नाही. त्याचप्रमाणे गुजराती विषयाची देखील पुस्तके बाजारात आली नसल्याने पालकांसह विद्यार्थीही हैराण झाले आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.