Advertisement

सावधान...अनधिकृत इंग्रजी शाळांची संख्या वाढतेय!


सावधान...अनधिकृत इंग्रजी शाळांची संख्या वाढतेय!
SHARES

मुंबईत मराठी शाळेचं वर्चस्व कमी होत असताना इंग्रजी शाळांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परंतु या शाळांमध्ये अनधिकृत शाळांचं प्रमाणही मोठं असल्याचं समोर आलं आहे. तेव्हा आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालताना अत्यंत सावधपणे निर्णय घेणे आवश्यक आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात शिक्षण विभागाच्या मान्यतेशिवाय 318 शाळा अनाधिकृतपणे सुरू असल्याचं उघड झालं आहे. दरवर्षी शैक्षणिक वर्ष सुरू होण्याअगोदर शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात येते. पालकांची फसवणूक होऊ नये, हा या मागचा उद्देश असतो.

शिक्षण उपसंचालक कार्यालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या यादीत मुंबई शहरात एकूण 113 शाळा अनधिकृत आहेत. या यादीत मराठी माध्यमांच्या तुलनेत इंग्रजी माध्यमाच्या जास्त शाळा अनधिकृत असल्याचं दिसत आहे. अनधिकृत शाळांची ही यादी शिक्षण विभागाच्या कार्यालयात उपलब्ध आहे. पालकांनी ही यादी बघून नंतरच शाळेत प्रवेश घ्यावा, असे आवाहन पालकांना करण्यात आले आहे.

अनधिकृत शाळांची यादी दरवर्षी जाहीर केली जाते, मात्र शाळांविरोधात कारवाई केली जात नाही. शिक्षण विभागाच्या बेजबाबदारपणामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होते.
- अनिल बोरनारे, अध्यक्ष, शिक्षक परिषद, मुंबई

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा