Advertisement

'आतापेक्षा मागच्या सरकारमधील मंत्री आणि कुलगुरू बरे होते'


'आतापेक्षा मागच्या सरकारमधील मंत्री आणि कुलगुरू बरे होते'
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या सध्या सुरू असलेलाृ्या अनागोंदी कारभारामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पदव्युत्तर पदवी प्रवेशाला स्थगिती द्यावी, अशी मागणी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केली आहे.



आदित्य ठाकरेंचा शिक्षण मंत्र्यांना टोला

विद्यापीठाचा आताचा कराभार पाहता आतापेक्षा मागच्या सरकारमधील मंत्री आणि कुलगुरू बरे होते, असा टोला आदित्य ठाकरे यांनी थेट शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना लगावला. ऑनलाईन तपासणी जोरात सुरू केली असताना पुढे काय झाले? ऑनलाईन तपासणी यशस्वी का झाली नाही? आणि यशस्वी झाली नाही तर ऑनलाईन पेपर तपासणीचा अट्टाहास कशासाठी? असा प्रश्नही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.

मुंबई विद्यापीठ आणि संलग्नित कॉलेजांच्या प्राध्यापकांकडून म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे. आता मुंबई विद्यापीठाने 2 हजार 275 नव्या प्राध्यापकांची पेपर तपासणीसाठी नियुक्ती केली आहे.


111 कोटींच्या ठेवी मुदतीपूर्वीच मोडल्या

त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी गेल्या 22 महिन्यांत तब्बल 111 कोटींच्या ठेवी मुदतीपूर्वीच मोडल्या अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे सगळीकडूनच कुलगुरूंवर टीकेची झोड उठली आहे. विद्यार्थी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. त्याचप्रामणे ‘कोणालाही क्लीनचिट न देता विद्यापीठातील मुदत ठेवींबाबत चौकशी करण्यात यावी‘ अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.




हे देखील वाचा - 

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची 'वटवावटवी'!

मुंबई विद्यापीठ करतंय तरी काय? २१० परीक्षांचे निकाल रखडले!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा